येस न्युज मराठी नेटवर्क ; तुळजापूर वेस येथील माहेश्वरीभवन जवळ घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने ६ मोबाईल आणि रोख ३१,०००₹ असा ६२,००० रुपयाचा माल चोरून नेला आहे. रियाज सलीम पटेल यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. पोलीस नाईक धुमाळ अधिक तपास करीत आहेत.