सोलापूर : गृहमंत्री सुशीलकुमारजी शिंदे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून सोलापूर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सुरेश हसापूरे व दक्षिण कॉंग्रेसचे अध्यक्ष हरीश पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोव्हिड काळात जिवाची पर्वा न करता वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यांतील आरोग्य सेविका आशा वर्कर्स परिचारिका व डॉक्टर असे 400 महिलांचा सन्मान आज गोविंदश्री मंगल कार्यालय येथे पार पडले. यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिद्धारामजी म्हेत्रे जि प अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, जि प सदस्य संजय गायकवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी दिगंबर गायकवाड, प्रदेश कॉंग्रेस सचिव पंडीत सातपुते, नगरसेवक शिवा बाटलीवाला, अशोक देवकते, मधुकर आठवले, श्रीदीप हसापूरे ,सुदर्शन हसापूरे, अनंत म्हेत्रे यांच्यासह आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोतीराम राठोड, जयशंकर पाटील, गुंजेगांवचे संतोष पवार, प्रकाश चव्हाण, कुरघोटचे सरपंच बनसिद्द बने, विनीत पाटील, रमेश चव्हाण, काशिनाथ कुंभार यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्मसिंह शिवशेट्टी तर आभार हरीश पाटील यांनी केले.