संभाजीराव शिंदे विद्यामंदिराचा 39 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

0
42

जुनी मिल आवारातील संभाजीराव शिंदे शिक्षण संकुलाचा 39 वा वर्धापन व स्वर्गीय संभाजीराव शिंदे यांची 76 वी पुण्यतिथी शाळेत साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून हरीभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक प्रसिद्ध व्याख्याते व साहित्यिक प्राध्यापक धन्यकुमार बिराजदार हे उपस्थित होते. प्रारंभी संस्थेचे संस्थापक स्वर्गीय विष्णुपंत तथा तात्यासाहेब कोठे व संभाजीराव शिंदे यांच्या प्रतिमांचे पूजन संस्थेच्या संचालिका राधिका चिलका, प्राचार्या वीणा कणबसकर, माजी प्राचार्य अंबादास चाबुकस्वार , प्राचार्य नागेशकुमार काटकर, मुख्याध्यापिका राजश्री नारायणकर, शिशु शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली सुरवसे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका राजश्री नारायणकर यांनी केले तर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी आनंदाची माझी शाळा हे कृतज्ञता पर गीत सादर केले. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विविध शाळा बाह्य परीक्षेत प्राविण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय बिभीषण सिरसट यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल लोहार यांनी केले तर, आभार प्रदर्शन मुख्याध्यापक नागेशकुमार काटकर यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व शाळेच्या मैदानावर वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. यावेळी बहुसंख्य विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.