सोलापूरातील पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी महापालिका आयुक्तांना निर्देश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
32

सोलापूर शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी महापालिका आयुक्तांना निर्देश देण्यात येतील. वेगवेगळ्या घटनांमध्ये विजेचा धक्का लागून तिघांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना शासनाच्या वतीने मदत केली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.

यासंदर्भात आ. प्रणिती शिंदे यांनी औचित्याचा मुद्दा मांडला होता. त्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पाणी हा जिव्हाळ्याचा विषय असून सोलापूर शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी महापालिका निर्देश देण्यात येतील.