लवकरच सांगली कोल्हापूर सह राज्यातील २० बस स्थानकांचे होणार बसपोर्ट; एअरपोर्ट च्या धर्तीवर मिळणार आधुनिक सुविधा…

0
55

सांगली ( सुधीर गोखले) – आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धर्तीवर राज्यातील जनतेला चांगल्या सुविधा आता बस स्थानकांमध्येही मिळणार आहेत बसस्थानकांचे आता ‘बसपोर्ट’ मध्ये रूपांतर होणार आहे यामध्ये राज्यातील वीस बस स्थानकांची निवड झाली असून सांगली कोल्हापूर स्वारगेट पिंपरी चिंचवड आदी बस स्थानकांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.
ज्या प्रमाणे अंतरराष्ट्रीय विमानतळांमध्ये प्रवाशांसाठी आधुनिक विविध सोइ सुविधा असतात त्याप्रमाणे या ‘बसपोर्ट’ मधेही अशा सुविधा आता प्रवाश्याना मिळतील सध्या बोरवलीमध्ये १६ मजली इतक्या उंचीचा बसपोर्ट ची निविदा प्रक्रियेमध्ये आहे.
तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी राज्यातील १३ बसस्थानके बसपोर्ट मध्ये रूपांतरित करण्याचा प्रस्ताव तयार केला होता, तर या सर्व बसस्थानकांचे सर्वेक्षण करून मूल्यमापन करण्याचे काम एकाच कंपनीला दिल्याने त्यावेळी बराच वादंग उठल्याने या प्रकल्पाला दिरंगाई झाली आणि हा प्रकल्पच मागे पडला आता तब्बल सात वर्षांनी आता तेरा ऐवजी वीस बसस्थानके बसपोर्ट मध्ये रूपांतरित होतील या मध्ये वेगवेगळे कंत्राटदार असतील निविदाही वेग वेगळ्या असतील.
आता महामंडळाने वीस बसस्थानके ‘बसपोर्ट’ मध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला असून प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे वास्तविशारद नेमले जातील आणि लवकरच या कामाची निविदा प्रसिद्ध होऊन प्रत्यक्ष काम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
यामुळे बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाश्याना अधिक सोइ सुविधा उपलब्ध होतील हे बसपोर्ट अत्याधुनिक असणार आहेत.