दोन मुलांसह विवाहित महिला घरातून बेपत्ता…
सोलापूर : बाळे येथील आकाश नगर येथे राहणारी सोनाली खंडेराव चव्हाण ही विवाहिता नऊ वर्षाचा मुलगा आणि पाच वर्षाची मुलगी असे तिघेही आठ जुलै रोजी घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेल्याबाबत अर्ज फौजदार चावडी पोलिस ठाण्यात देण्यात आला आहे.
दागिने व वीस हजार रुपये घेऊन तरुणी घरातून पळाली…
सोलापूर : बाळे येथील राजश्री नगर येथे राहणारी पायल ज्ञानेश्वर जाधव ही २१ वर्षाची तरुणी ५ जुलै रोजी घरातून कोणालाही काहीही न सांगता घरातील दागिने व वीस हजार रुपये घेऊन गेल्याचा अर्ज फौजदार चावडी पोलिस ठाण्यात करण्यात आला आहे. पोलीस सब इन्स्पेक्टर मंदुरकर अधिक तपास करीत आहेत.
डाळिंब संशोधन केंद्रातून लॅपटॉपची चोरी….
सोलापूर : डाळिंब संशोधन केंद्र येथील कार्यालयातून लॅपटॉप चोरीस गेल्याची फिर्याद राहुल देविदास डमाळे या कृषी वैज्ञानिकाने फौजदार चावडी पोलिस ठाण्यात केली आहे. पोलीस सब इन्स्पेक्टर देशमाने या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
फ्लॅटचे दार उघडे असल्याने मोबाईल हँडसेट पळविला
सोलापूर : होटगी रस्त्यावरील गजदंत अपार्टमेंटमध्ये फ्लॅटचे दार उघडे असल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने मोबाईल हँडसेट पळवून नेल्याची तक्रार विजापूर नाका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. कमल कुमार अग्रवाल यांनी ही तक्रार केली असून पोलीस नाईक पटेल अधिक तपास करीत आहेत.











