३० सप्टेंबरनंतर २००० रुपयांच्या नोटेचे काय होणार?

0
17

२००० रुपयांची नोट वितरणातून बंद केल्यानंतर आता आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरबीआयचा २००० रुपयांची नोट आणण्याचा उद्देश पूर्ण झाला आहे. २००० रुपयांच्या नोटा बदलून त्या जमा केल्या जातील, यासाठी चांगली प्रणाली कार्यरत आहे. जेणेकरून सामान्य लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. याप्रसंगी एका पत्रकारानं ३० सप्टेंबरनंतर नोटेचे काय होणार असे विचारले असता ते म्हणाले, ३० सप्टेंबरनंतर २००० रुपयांच्या नोटा कायदेशीर राहणार नाहीत, असे आम्ही काहीही म्हटलेले नाही. नोटाबंदीनंतर काढलेल्या नोटांची भरपाई करण्यासाठी २००० रुपयांच्या नोटा बाजारात आणल्या गेल्या. आता बाजारात अधिक मूल्यांच्या नोटांची कमतरता नसल्याने त्या वितरणातून काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २००० रुपयांची नोट कायदेशीर निविदा राहील आणि ती ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत बँकांमध्ये सहजपणे जमा केली जाईल आणि बदलली जाऊ शकते. असं शक्तिकांत दास म्हणाले.