• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वाडिया हॉस्पिटलला विविध संस्थांची 30 कोटींची मदत, लवकरच 100 बेडेड हॉस्पिटल

Yes News Marathi by Yes News Marathi
August 1, 2026
in Blog
0
वाडिया हॉस्पिटलला विविध संस्थांची 30 कोटींची मदत, लवकरच 100 बेडेड हॉस्पिटल
0
SHARES
3
VIEWS

गुरुपौर्णिमा, २०२५ च्या शुभ दिनी नूतनीकृत वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल येथे ओपीडी विभाग, वातानुकुलीत औषधालय, वीस बेड्स चा वॉर्ड,पॅथॉलॉजी लॅब, सिटीस्कॅन आणि कॅन्टीन अशा विविध विभागांचे उद्घाटन झाले. त्यानंतर आता गेल्या वर्षभरात हॉस्पिटल ने केलेली प्रगती आणि कार्यरत झालेले विविध विभाग दाखवण्यासाठी आणि माहिती देण्यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केली होती. हॉस्पिटल मधील ७४ बेड्सचा आंतररुग्ण विभाग, ऑपरेशन थिएटर्स व इतर अनेक विभाग पत्रकार बंधूंना दाखवले आणि डॉक्टरांनी विविध सोयी सवलतीं बद्दल माहिती सांगितली.

    हॉस्पिटलमध्ये आता आंतररुग्ण विभागात तीन मजले कार्यरत झाले आहेत. त्यात 3 आयसीयूतील  30 बेड,१२ वातानुकूलित खोल्या, ६ स्वतंत्र खोल्या,  प्रसूती विभाग,  वॉर्डतील १९ बेड्स, कॅज्युयल्टी विभाग याची सुरुवात झाली आहे. प्रशस्त मोकळे आवार, शहराच्या मध्यभागी असल्यामुळे सोयीचे, अत्याधुनिक साधनसामुग्री व तत्पर नर्सिंग सेवा ह्यामुळे वाडियात रुग्णांना समाधानकारक सेवा मिळत आहे. शहरातील ६७ तज्ञ डॉक्टर्स या हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. 

ऑक्सीजन, मेडिकल गॅसेस, ह्यासाठीची पाईपलाईनची व्यवस्था, निऑन कोडेन कंपनीचे मल्टीप्यारा मॉनिटर्स, अद्ययावत तीन एक्स-रे मशीन्स, तीन सोनोग्राफी मशीन्स, सात व्हेंटिलेटर्स इत्यादी अनेक उपकरणे वाडियामध्ये उपलब्ध आहेत. आठ बेड्सचे अद्ययावत डायलिसिस सेंटर एनएचपीसीएल कडून पुरस्कृत झाले असून फ्रेजेनीयस या कंपनीची डायलिसिसची सर्वोत्तम मशीन्स घेतली आहेत.

डी मार्ट फाउंडेशनने चार ऑपरेशन थिएटर्स आणि सर्जिकल युनिट तयार करण्यासाठी दिलेल्या मोठ्या मदतीतून अत्यंत अद्ययावत अशी चार ऑपरेशन थिएटर्स आपल्या शहरात झाली आहेत. ही विशेष बाब नक्कीच उल्लेखनीय आहे. या ऑपरेशन थिएटर्स संकुलाचे उद्घाटन डी मार्टचे संचालक एन भास्करन यांच्या शुभहस्ते रविवार दि २.८.२६ रोजी सायंकाळी ५ वाजता संपन्न होणार आहे.

कार्ल झाईस कंपनीचा अत्याधुनिक ऑपरेटिंग मायक्रोस्कोप एलआयसी गोल्डन ज्युबिली फाऊंडेशन यांच्या सौजन्याने हॉस्पिटलसाठी जर्मनीतून मागवण्यात आला आहे.समाजानेच समाजासाठी निर्माण केलेल्या या हॉस्पिटलमध्ये, वाजवी दरात सर्वोत्तम उपचार मिळावेत ही या न्यासाची भावना अध्यक्ष श्री. प्रवीणसिन्ह परदेशी यांनी व्यक्त केली. कॅथलॅब, अद्ययावत कार्डिओलॉजी विभाग, नवजात शिशु आयसीयू चे काम सुरू असून हे विभाग थोड्याच अवधी मध्ये कार्यान्वित होत आहेत.विविध विमा कंपन्यांची नोंदणीही झाली आहे.विद्यापीठ मान्य हेल्थ टेक्निशियन कोर्सेसही इथे मंजूर झाले असून नर्सिंग कॉलेजचा अर्ज शासनाकडे दाखल केलेला आहे. त्यामुळे लवकरच इथे या सुविधा उपलब्ध होतील. भविष्यात कॅन्सर निदान आणि उपचारांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्याचे काम सुरू झाले आहे.सर्व सुविधांनी युक्त असा हा आंतररुग्ण विभाग सुरू करताना अनेक मदतीचे हात पुढे आले. वातानुकूलित खोल्यांसाठी चंद्रकांत पटवर्धन आणि परिवार, मंगलेशा बेदमुथा, भुतडा परिवार, ओसवाल केमिकल्स आणि वामसी लॅब यांनी देणगी दिली आहे.

तसेच स्पेशल रूम साठी बाहेती, गिरीश बक्षी, नंदा करवा,कौस्तुभ करवा आणि सोनी परिवार, विश्व रचना इन्फ्रा आणि हॉटेल राजयोग यांनी देणग्या दिल्या आहेत.

आयसीयू आणि क्वार्टर्स नूतनीकरणासाठी कै. उत्पल पटेल यांचे स्नेही, आसावा कुटुंबियांतर्फे कॅज्यूअल्टी, बाबूभाई मेहतांतर्फे मेडिकल स्टोअर, ओसी स्पेशालीटीस तर्फे पेडिआट्रीक खोल्या, लोहे यांच्यातर्फे वॉर्ड, एस् व्ही एस् सोर्सिंग यांचे तर्फे शिशु विभाग, रामसुख संतोकीराम चंडक ट्रस्टतर्फे पेडीयाट्रिक आयसीयू अशा विविध देणग्या संस्थेस प्राप्त झाल्या आहेत. तसेच रु ५००० पासून दहा लाख अशाही देणग्या समाजातील लोकांनी देऊन वाडियावर विश्वास दाखवला आहे. काहींनी वस्तू रूपाने उदा.माळवदे कुटुंबीयाजकडून वॉटर कूलर, एस्. व्ही . एस्. व जनकल्याण समितीने एक एक अॅम्ब्युलन्स, अल्ट्रा टेक कंपनीने सोलर युनिट, ओसी स्पेशालिटी व गिरीश गोडबोले यांनी जनरेटर्स, बँक ऑफ इंडियाने व्हेंटीलेटर अशा तऱ्हेने या हॉस्पिटल साठी समाजातून अनेक दानशूरांची मदत लाभली आहे.

     भविष्यात हे हॉस्पिटल सर्वच बाबींमध्ये उजवे ठरावे, पूर्वी प्रमाणेच सर्वांना आपले वाटावे, रुग्णांना नेमक्या आणि गरजेच्या सेवा योग्य दरात अत्याधुनिक साधन सुविधांद्वारे मिळाव्यात आणि समाजाच्या विश्वासास पात्र ठरणारी आरोग्य सेवाकेंद्र तयार व्हावे, यासाठी हॉस्पिटलचे संचालक मंडळ, तज्ञ डॉक्टर्स, सेवाव्रती व कर्मचारी सदैव तत्पर आहेत. ह्यासाठी संपूर्ण समाजाच्या सक्रिय सहकार्याची अपेक्षा आहे असे मानद सचिव शिरीष गोडबोले म्हणाले. 

  या पत्रकार परिषदप्रसंगी राम रेड्डी, डॉ. शिरीष कुमठेकर, डॉ. सुनील मेहता, डॉ. संदीप भागवत, डॉ. राजेंद्र घुली, डॉ. विजय सावस्कर, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर सोडल,  वासुदेव बंग, संजय पटेल ,श्री. कल्पेश झवेरी,  राजेश गांधी, राजन रिसबुड, निष्काम सेवा देणारे सेवाव्रती तसेच श्रीमती सविता लळीत, रामदासी,  जाम मिलचे  राजेश दमाणी, इतर मान्यवर व कर्मचारी उपस्थित होते.
Previous Post

भीमेतून एवढे पाणी वाहून जाते..! वडापूरच्या 2 टीएमसी धरणाचे काय झाले..?

Next Post

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना सोलापूर महापालिकेकडून अभिवादन

Related Posts

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान
Blog

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान

September 22, 2026
आनंदवार्ता – दमाणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूल कामाचे स्पीड वाढले..!
Blog

आनंदवार्ता – दमाणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूल कामाचे स्पीड वाढले..!

September 21, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!
Blog

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!

September 19, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन घरफोडीचे गुन्हे ग्रामीण पोलिसांनी उघड करून दोन आरोपींना मुद्देमालासह केली अटक
Blog

दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन घरफोडीचे गुन्हे ग्रामीण पोलिसांनी उघड करून दोन आरोपींना मुद्देमालासह केली अटक

September 19, 2026
सोलापूरच्या श्यामसुंदर येदूर यांची पुणे संगीत महोत्सवात हार्मोनियमची सुरेल साथ
Blog

सोलापूरच्या श्यामसुंदर येदूर यांची पुणे संगीत महोत्सवात हार्मोनियमची सुरेल साथ

September 17, 2026
जिल्ह्यात १७ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत “स्वच्छता ही सेवा -२०२६”  अभियान: सिईओ कुशल जैन यांची माहिती
Blog

जिल्ह्यात १७ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत “स्वच्छता ही सेवा -२०२६” अभियान: सिईओ कुशल जैन यांची माहिती

September 16, 2026
Next Post
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना सोलापूर महापालिकेकडून अभिवादन

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना सोलापूर महापालिकेकडून अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर ग्रामीण पोलिसांनी कुर्डूवाडी मध्ये दहा लाखाचे एमडी ड्रग्ज पकडले, अमर मुलाणी या आरोपीला अटक

सोलापूर ग्रामीण पोलिसांनी कुर्डूवाडी मध्ये दहा लाखाचे एमडी ड्रग्ज पकडले, अमर मुलाणी या आरोपीला अटक

September 23, 2026
मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!

मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!

September 22, 2026
शेअर मार्केटमध्ये जादा नफ्याचे आमिष; सोलापुरात 44.78 लाखांची ऑनलाइन फसवणूक

शेअर मार्केटमध्ये जादा नफ्याचे आमिष; सोलापुरात 44.78 लाखांची ऑनलाइन फसवणूक

September 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026