• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

लोकशाही उत्सवाच्या कामांमध्ये मतदानादिवशी स्वयंसेवक युवकांनी उचलला खारीचा वाटा…!

Yes News Marathi by Yes News Marathi
May 10, 2024
in इतर घडामोडी
0
लोकशाही उत्सवाच्या कामांमध्ये मतदानादिवशी स्वयंसेवक युवकांनी उचलला खारीचा वाटा…!
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर :- सोलापूर लोकसभा निवडणूक 2024 अंतर्गत मंगळवेढा तालुक्यात भोसे , नंदेश्वर , लक्ष्मी दहिवडी व मंगळवेढा या चार मतदान केंद्रावर मतदारांच्या स्वागतासाठी रांगोळी , सजावट, मतदारांचे स्वागत करणे , मतदान खोलीपर्यंत मतदारांना पोहचविणे आदी कामांमध्ये मंगळवेढ्यातील श्री.संत दामाजी महाविद्यालय व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केद्रातील विद्यार्थ्यांनी लोकशाही उत्सवाच्या कामांमध्ये पर्यायाने मतदानाचे प्रमाण वाढविण्यामध्ये युवकांनी आपला खारीचा वाटा उचलल्याचे दिसून आले.

  सोलापूर लोकसभा निवडणूकीसाठी मंगळवेढा तालुक्यात भोसे , नंदेश्वर , लक्ष्मी दहिवडी व मंगळवेढा या चार मतदान केंद्रावर मतदारांना आपले मतदान कोणत्या खोलीमध्ये सुरू आहे हे समजण्यामध्ये अडचण व गोंधळ होऊ नये म्हणून दक्षता घेण्यात आली होती.या मतदान केंद्रावर दिशादर्शक फलक तयार केले होते आणि मतदारांना प्रत्यक्ष मतदान खोलीपर्यंत पोहचविण्यासाठी मंगळवेढ्यातील श्री.संत दामाजी महाविद्यालय व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केद्रातील विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी यांना स्वयंसेवक म्हणून मदतीला घेण्याचे नियोजन करण्यात आले होते.आणि या कामामध्येही विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतल्याचे दिसून आले.

     या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी निळा , हिरवा , पांढरा , गुलाबी अशा रंगाचे टी शर्ट घातले होते.या केंद्रावरील मतदारांच्या स्वागतासाठी रांगोळी , सजावट, मतदारांचे स्वागत करणे या कामामध्ये चांगली मदत केली.सदर कामांमध्ये मंगळवेढ्यातील संत दामाजी महाविद्यालय व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केद्रातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.लोकशाही उत्सवाच्या कामामध्ये पर्यायाने मतदानाचे प्रमाण वाढविण्यामध्ये भावी पिढी असणाऱ्या युवक व युवतींनी आपला खारीचा वाटा उचलल्याचे दिसून आले.विशेषतः मतदान केंद्रावरील वयस्कर , अपंग , निरक्षर , रुग्ण आदी मतदारांना त्यांची मतदार स्लिप बघून केंद्रातील खोलीकडे पोहच करण्याची व्यवस्थेसाठी चांगली मदत झाली.यासाठी सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार मदन जाधव ,नायब तहसीलदार ( निवडणूक ) जयश्री स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी डी.एस.इंगोले , पुरवठा अधिकारी हणमंत पाटील ,तलाठी दिनेश सोनवणे , कोतवाल जरग यांनी परिश्रम घेतले.

जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सर्व नोडल अधिकारी व सर्व प्रशासकीय यंत्रणा यांनी मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रयत्न केले तसेच मतदान केंद्रावर मतदारांना स्वयंसेवकाच्या माध्यमातून चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला.

‘‘ मंगळवेढ्यातील इंग्लिश स्कूल येथील मतदान केंद्रावर जास्त बुथ असल्यामुळे आपले मतदान कोणत्या खोलीमध्ये आहे हे समजत नव्हते पण विद्यार्थी स्वयंसेवक मदतीला आल्यामुळे मला मतदान अगदी वेळेत करता आले. – विश्वास माने , मतदार ’’

Previous Post

अखेर निकाल लागला! डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात दोघांना जन्मठेप, तिघे निर्दोष

Next Post

अ.भा. जैन कासार संस्थेच्या अध्यक्षपदी विजय कासारवार्षिक सर्वसाधारण सभा : उपाध्यक्षपदी मांगले तर कार्याध्यक्षपदी दुरुगकर

Related Posts

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश
इतर घडामोडी

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026
५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..
इतर घडामोडी

५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..

September 24, 2026
५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश
इतर घडामोडी

५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश

September 24, 2026
आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे
इतर घडामोडी

आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे

September 24, 2026
रविवारी बँका सुरू राहणार; त्यानंतर तीन दिवसांचा देशव्यापी संप
इतर घडामोडी

रविवारी बँका सुरू राहणार; त्यानंतर तीन दिवसांचा देशव्यापी संप

September 24, 2026
Next Post
अ.भा. जैन कासार संस्थेच्या अध्यक्षपदी विजय कासारवार्षिक सर्वसाधारण सभा : उपाध्यक्षपदी मांगले तर कार्याध्यक्षपदी दुरुगकर

अ.भा. जैन कासार संस्थेच्या अध्यक्षपदी विजय कासारवार्षिक सर्वसाधारण सभा : उपाध्यक्षपदी मांगले तर कार्याध्यक्षपदी दुरुगकर

ताज्या बातम्या

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

September 24, 2026
नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026