• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

विठ्ठल एकट्या हिंदू धर्माचा नाही, स्वामी कोर्टात गेले तर आम्हीही लढा देऊ – डॉ भारत पाटणकर

Yes News Marathi by Yes News Marathi
January 17, 2023
in इतर घडामोडी
0
विठ्ठल एकट्या हिंदू धर्माचा नाही, स्वामी कोर्टात गेले तर आम्हीही लढा देऊ – डॉ भारत पाटणकर
0
SHARES
0
VIEWS

विठ्ठल रखुमाई मुक्तिदिन कार्यक्रमात नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. विठ्ठल एकट्या हिंदू धर्माचा नाही , स्वामी कोर्टात गेले तर आम्ही देखील कोर्टात आणि रस्त्यावर लढाई लढू, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे डॉ भारत पाटणकर यांनी दिला आहे. यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आज विठ्ठल रुक्मिणी मुक्तीचा नववा मुक्तिदिन तुकाराम भवन येथे साजरा करण्यात आला. यावेळी डॉ भारत पाटणकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर बडवे उत्पात यांच्या ताब्यातून 17 जानेवारी 2014 रोजी पूर्णपणे सरकारच्या ताब्यात आले आणि याचाच आनंद साजरा करण्यासाठी श्रमिक मुक्ती दल , संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने हा मुक्तिदिन साजरा केला जात असतो.

मात्र पुन्हा एकदा विठ्ठल मंदिर सरकारच्या ताब्यातून मुक्त करून हिंदू संतांच्या ताब्यात देण्यासाठी जेष्ठ विधिज्ञ आणि भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे आजच्या मेळाव्यात स्वामी यांच्या भूमिकेच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटणार हे स्पष्टच होते. त्यानुसार आज डॉ भारत पाटणकर यांनी विठ्ठल रखुमाई हे फक्त हिंदू धर्माचे नसून तुम्हाला जी मंदिरे घ्यायची आहेत ती हिंदू मंदिरे घ्या पण हे फक्त हिंदूंचे मंदिर नसल्याचे सांगितल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. कोणताही धर्म नव्हता तेव्हापासून पंढरपूरची वारी सुरु असल्याचे आश्चर्यकारक वक्तव्य डॉ पाटणकर यांनी केले असून याबाबत अनेक संशोधने झाल्याचे त्यांनी सांगितले. ज्या जुन्या विठ्ठलाच्या कथा आहेत त्यात कोठेही हिंदू धर्माचा उल्लेख नसल्याचे सांगताना संत ज्ञानेश्वर , संत तुकाराम आणि संत नामदेवांनी हे विठ्ठल हे बुद्ध असल्याचे सांगितल्याचे वक्तव्य पाटणकर यांनी केले आहे. त्यामुळे हे फक्त हिंदूंचे मंदिर नसून येथे धर्म, जाती , स्त्री पुरुष यांच्या समतेचा संबंध असल्याने आम्ही या लढत उतरल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान विठ्ठल मंदिर सरकारच्या ताब्यातून काढण्यासाठी कोणी न्यायालयात गेले तर आम्ही देखील त्याच्या विरोधात लढा उभारू आणि न्यायालयात देखील जाऊ असा इशारा पाटणकर यांनी दिला आहे. मात्र इतर धर्माच्या धार्मिक स्थळांना सरकार का ताब्यात घेत नाही? असं विचारलं असता आपण नंतर बोलू असे गोल गोल उत्तर देत त्यांनी बोलणे टाळले. कोणताही धर्म स्थापन होण्यापूर्वी वारी सुरु होती आणि विठ्ठल मंदिर हिंदूंचे आहे असा कुठेही उल्लेख नाही, या त्यांच्या दोन वादग्रस्त वक्तव्यावर पुन्हा नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Previous Post

संक्रांतीनिमित्त नमो एकेडेमी तर्फे नृत्याविष्कार सादर

Next Post

सर्प तज्ञ, NGO व वन्यजीव विभाग यांच्यासाठी VDO कॉन्फरन्सचे आयोजन

Related Posts

भूसंपादनाच्या कामास विलंब झाल्यास मिळणार एक टक्का अधिकचा व्याजदर..!
इतर घडामोडी

भूसंपादनाच्या कामास विलंब झाल्यास मिळणार एक टक्का अधिकचा व्याजदर..!

August 11, 2026
भाजप ओबीसी मोर्चा सोलापूर शहर सोलापूर पूर्व पदाधिकारी मेळावा उत्साहात संपन्न
इतर घडामोडी

भाजप ओबीसी मोर्चा सोलापूर शहर सोलापूर पूर्व पदाधिकारी मेळावा उत्साहात संपन्न

August 11, 2026
सोलापुरात नव्याने सुरू झाले दंतचिकित्सा विभाग
इतर घडामोडी

सोलापुरात नव्याने सुरू झाले दंतचिकित्सा विभाग

August 11, 2026
731 व्या समाधी सोहळ्यानिमित्त संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधीला अभिषेक
इतर घडामोडी

731 व्या समाधी सोहळ्यानिमित्त संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधीला अभिषेक

August 11, 2026
मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडून चंद्रभागा घाट व श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची पाहणी
इतर घडामोडी

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडून चंद्रभागा घाट व श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची पाहणी

August 10, 2026
अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!
इतर घडामोडी

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!

August 7, 2026
Next Post
सर्प तज्ञ, NGO व वन्यजीव विभाग यांच्यासाठी VDO कॉन्फरन्सचे आयोजन

सर्प तज्ञ, NGO व वन्यजीव विभाग यांच्यासाठी VDO कॉन्फरन्सचे आयोजन

ताज्या बातम्या

भूसंपादनाच्या कामास विलंब झाल्यास मिळणार एक टक्का अधिकचा व्याजदर..!

भूसंपादनाच्या कामास विलंब झाल्यास मिळणार एक टक्का अधिकचा व्याजदर..!

August 11, 2026
राज्य मंत्रिमंडळाने घेतले हे ८ मोठे निर्णय

राज्य मंत्रिमंडळाने घेतले हे ८ मोठे निर्णय

August 11, 2026
मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!

मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!

August 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026