संक्रांतीनिमित्त नमो एकेडेमी तर्फे नृत्याविष्कार सादर

0
21

सोलापूर – संक्रांतीचे औचित्य साधून दि. 15 जानेवारी 2023 रोजी नमो एकेडेमीने पून्हा एकदा बालकलाकारांच्या विविध नृत्यांसाठी रंगमंच थाटला. त्याच बरोबर पालकांचे ही कौतुक करत, हळदी कुंकवाचा सुरेख कार्यक्रम साधला. अंबिकाताई काटवे व ऐश्वर्या पवार ह्यांच्या मार्गदर्शनाखाली नमो एकेडेमीच्या विद्यार्थिनींनी भरतनाट्यम नृत्य सादर केले. त्याचबरोबर लीनाताई कासूलवार ह्यांच्या मार्गदर्शनाखाली बालकलाकारांनी फ्रीस्टाईल नृत्य करून कार्यक्रमाची शोभा व्दिगुणीत केली.