येस न्युज मराठी नेटवर्क : तुम्ही तुमचं आधार कार्ड UAN ला लिंक केलंय का? नसेल केलं तर आजच करा. कारण आज शेवटचा दिवस आहे. जर आजच आधार कार्ड लिंक केलं नाही, तर तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो. याव्यतिरिक्त ईपीएफ अकाउंटमध्ये मासिक कॉन्ट्रीब्युशनही जमा होणार नाही. त्यामुळे तुमच्याकडे फक्त आजचा वेळ आहे. तुम्ही EPFO च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन उमंग अॅपमार्फत लिंक करु शकता.
एम्प्लॉई प्रॉविडंट फंड ऑर्गनायजेशनने (EPFO)अनेकदा सांगितलं आहे की, जर पीएफ (Provident Fund) सब्स्क्रायबर्सनी 30 नोव्हेंबरपर्यंत आपल्या UAN ला आधारशी लिंक केलं नाही, तर त्यांचं खातं बंद होईल. यामध्ये पीएफचे पैसे जमा होऊ शकणार नाही आणि पगारदार वर्गातील कर्मचारी त्यांच्या पीएफ खात्यातून पैसे काढू शकणार नाहीत.