सोलापूर : सेटलमेंट फ्री कॉलनी येथील आकाश मोहन खलसे यांच्या घरात अज्ञात चोरट्याने दरवाजाचे कुलूप तोडून चोरी केली आहे . या चोरीची फिर्याद आकाश खडसे यांनी सलगर वस्ती पोलिस ठाण्यात दिली असून एक हजार रुपयाची गॅस शेगडी, त्याचप्रमाणे गॅस सिलेंडर, लाकडी कॅरम बोर्ड, 20 किलो धान्य असा जवळपास अडीच हजार रुपयांचा माल चोरीस गेला , असे खलसे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.