• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

‘डेल्टा प्लस’चा सोलापुरात एकही रुग्ण नाही

Yes News Marathi by Yes News Marathi
August 26, 2021
in इतर घडामोडी
0
‘डेल्टा प्लस’चा सोलापुरात एकही रुग्ण नाही
0
SHARES
0
VIEWS

२४ जिल्ह्य़ांत प्रादुर्भाव
मुंबई : राज्यातील २४ जिल्ह्य़ांमध्ये डेल्टा पल्स या करोनाच्या उत्परिवर्तित विषाणूच्या प्रकाराचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळले आहे. यात सर्वाधिक रुग्ण रत्नागिरी आणि जळगाव जिल्ह्य़ामध्ये आढळले असले तरी त्या तुलनेत येथे बाधितांचे प्रमाण वाढलेले नाही. सोलापूर जिल्ह्यात डेल्टा प्लसचा एकही रुग्ण आढळलेला नाही . त्यामुळे डेल्टा प्लसच्या प्रसाराचा वेग हा डेल्टाच्या तुलनेत कमी आहे. मात्र तरीही यावर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. सोमवारी नव्याने २७ डेल्टा प्लसबाधित रुग्ण आढळल्यामुळे राज्यातील रुग्णांची संख्या १०३ झाली आहे. आता एकूण २४ जिल्ह्य़ांमध्ये याचा प्रादुर्भाव असल्याचे जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्वेन्सिंग) चाचण्यांमधून निदर्शनास आले आहे. यात ५० टक्के रुग्ण हे विदर्भ आणि कोकण विभागात आढळले आहेत. ‘रत्नागिरी जिल्ह्य़ातील सर्वाधिक १५ रुग्ण हे संगमेश्वर तालुक्यात आढळले आहेत. परंतु या भागात संसर्गाचा प्रसार वाढल्याचे किंवा एकाच ठिकाणी रुग्णसंख्या वाढलेली आढळलेले नाही. कोकण विभागात बाधितांचे प्रमाण जास्त सिंधुदुर्ग आणि चिपळूणमध्ये होते. रत्नागिरीतील बाधितांचे प्रमाण तर आता दोन टक्कय़ांच्याही खाली आले आहे’, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी सांगितले. ‘जळगावमध्ये १३ रुग्ण हे विविध ठिकाणी आढळले असून या गावांमध्ये सुमारे ५०० आरटीपीसीआर चाचण्या करूनही बाधितांचे प्रमाण फारसे आढळलेले नाही. हे रुग्ण जूनमध्ये बाधित झाले होते. यांच्या संपर्कातीलही फारसे बाधित झाल्याचे दिसून आलेले नाही’, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पातोडे यांनी सांगितले. डेल्टा प्लस हा विषाणूचा प्रकार आढळून एक महिन्याहूनही अधिक काळ उलटला आहे. एखाद्या भागात विषाणूचा संसर्ग पसरण्यास साधारण १४ दिवसांचा कालावधी लागतो. यानुसार दुपटीहून अधिक कालवधी उलटला तरी डेल्टाच्या तुलनेत रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढल्याचे आढळलेले नाही. त्यामुळे संसर्ग प्रसाराचा वेगकमी आहे. परंतु हा डेल्टाचा उपप्रकार असल्यामुळे यात त्याचेच अंश आहेत. त्यामुळे याची घातकता कमी आहे असे सध्या म्हणता येणार नाही. यासाठी आणखी मोठय़ा प्रमाणात रुग्णसंख्येचा अभ्यास होणे आवश्यक आहे, असे आरोग्य आयुक्तालयाचे माजी संचालक आणि एपिडेमियोलॉजिस्ट डॉ. प्रकाश डोके यांनी सांगितले.
जिल्हानिहाय रुग्णांची आकडेवारी
जळगाव (१३), रत्नागिरी (१५), मुंबई (११), कोल्हापूर (७), ठाणे, पुणे, अमरावती, गडचिरोली प्रत्येकी सहा, नागपूर (५), अहमदनगर (४), पालघर, रायगड, अमरावती प्रत्येकी तीन, नांदेड, गोंदिया, सिंधुदुर्ग, नाशिक प्रत्येकी दोन, चंद्रपूर, अकोला, सांगली, नंदुरबार, औरंगाबाद, बीड, भंडारा प्रत्येकी एक .

Previous Post

वेळापुरच्या अर्धनारी नटेश्र्वरला विजेतेपद

Next Post

महावितरण अधिकाऱ्यांना उलटे टांगू – पंढरपूर मधील शेतकरी आक्रमक

Related Posts

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी
इतर घडामोडी

वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी

May 7, 2026
Next Post
महावितरण अधिकाऱ्यांना उलटे टांगू – पंढरपूर मधील शेतकरी आक्रमक

महावितरण अधिकाऱ्यांना उलटे टांगू - पंढरपूर मधील शेतकरी आक्रमक

ताज्या बातम्या

TOP 25 । प्राणी संग्रहालयासह सोलापुरातील रस्त्यांचे कोट्यावधी रुपयाचे प्रस्ताव मनपा बोर्डासमोर..!

TOP 25 । प्राणी संग्रहालयासह सोलापुरातील रस्त्यांचे कोट्यावधी रुपयाचे प्रस्ताव मनपा बोर्डासमोर..!

May 12, 2026
सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

May 12, 2026
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026