टीचर्स स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित टीचर्स प्रीमियर लीग या शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या स्पर्धेत जवळपास 112 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षण खात्याचे संबंधित कर्मचारी सहभागी झालेले आहेत. ही स्पर्धा रेल्वे मैदान येथे प्रकाशझोतात खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत 112 खेळाडूंमधून आठ संघ तयार करण्यात आले आहेत.
यंदाचे या क्रिकेट स्पर्धेचे चौथे सीजन असून यंदाची स्पर्धा झाडे लावा झाडे जगवा आणि मतदानाचा टक्का वाढविणे या थीमवर आयोजित करण्यात आली आहे स्पर्धेचे उद्घाटन दिनांक 24 एप्रिल रोजी जिल्हा परिषद सोलापूर येथील प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख साहेब यांच्या हस्ते होणार आहे.
या स्पर्धेत संघ मालक म्हणून हंचाटे सुपर किंग्स संघाचे भालचंद्र हंचाटे सर, सह्याद्री सुपर फायटर चे अमोल पवार सर, शाहू वॉरियर्सचे सुमित गाडेकर सर, विनर वॉरियर्सचे इर्शाद शेख सर, भोले फायटर्सचे उमेश युवनाती सर, शंभूचे शिलेदार या संघाचे अश्विन नागणे सर, रुक्माई स्टार इलेव्हन चे रवी चव्हाण सर, छत्रपती फायटर या संघाचे ज्ञानेश्वर पाटील सर यांचे सहकार्य लाभत आहे.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्राथमिक शिक्षण मंडळाचे पर्यवेक्षक श्री मनीष बांगर साहेब,इस्माईल शेख सर,दुर्गेश बधे सर, निलेश पवार सर, शिवकुमार बेलुरे सर, इसाक शेख सर ,रियाज नदाफ सर , पांडुरंग गेजगे सरआधी परिश्रम घेत आहेत.