राज्यात गुरूवारी 2813 रुग्णांची नोंद

0
16
Abs 2019-nCoV RNA virus - 3d rendered image on black background. Viral Infection concept. MERS-CoV, SARS-CoV, ТОРС, 2019-nCoV, Wuhan Coronavirus. Hologram SEM view.

मुंबई : राज्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. गेल्या दोन दिवसापासून हाच आकडा दोन हजारापेक्षा जास्त आहे. तर आज राज्यातील कोरोना रुग्णसंख्या दररोज गेल्या दोन महिन्यातील उच्चांक गाठला आहे. गुरूवारी राज्यात तब्बल 2 हजार 813 रुग्ण आढळून आले आहेत. तर मुंबईत 1702 रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईकरांसाठी ही चिंतेची बाब आहे.

मुंबईकरांची चिंता वाढली
आज राज्यात 2813 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 1047 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरातील असून मुंबईत आज 1702 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आज कोरोनाच्या एका मृत्यूची नोंद झाली आहे.