• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

विडी कामगारांचे हक्क अबाधित ठेवलेच पाहिजेत; दिवाळीनंतर ठोस निर्णय – कामगार मंत्र्यांचे आश्वासन

Yes News Marathi by Yes News Marathi
September 16, 2025
in इतर घडामोडी
0
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर –“शहर व जिल्ह्यातील तब्बल ४० हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह विडी उद्योगावर चालतो. परंतु कामगार कायद्यांतर्गत असलेले हक्क मिळत नसल्याने विडी कामगारांवर अन्याय होत आहे. किमान वेतन, बोनस, घरभाडे, मातृत्व लाभ यांसारखे हक्क तातडीने दिले नाहीत तर आम्हाला संघर्ष उभारावा लागेल,” अशी ठाम भूमिका ज्येष्ठ कामगार नेते व माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांनी मंगळवारी घेतली.

मंगळवार, दि. १६ सप्टेंबर रोजी विडी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत राज्याचे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांना शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले. या शिष्टमंडळात कॉ. आडम मास्तर यांच्यासह सीटूचे राज्य उपाध्यक्ष कॉ. युसुफ शेख मेजर, नसीमा शेख, सुनंदा बल्ला, शकुंतला पाणीभाते, विल्यम ससाणे, दीपक निकंबे, कामगार सेनेचे नेते विष्णू कारमपुरी महाराज आदी मान्यवरांचा समावेश होता.

कामगार कायद्यांनुसार विडी कामगारांना किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी, बोनस, ग्रॅच्युइटी, मातृत्व लाभ, बाळंतपण रजा, शिष्यवृत्ती व गृहनिर्माण सुविधा यांसारखे अनेक हक्क आहेत. शासन निर्णयानुसार दर हजारी विड्यांसाठी किमान वेतन ४०२ रुपये असायला हवे. मात्र ते प्रत्यक्षात मिळत नाही. याशिवाय, मजुरी रोखीने कारखान्यात देण्याची तरतूद असूनही बँकेमार्फत मजुरी देण्यात येते. त्यामुळे कामगारांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.

सन २००२ पर्यंत विडी कामगारांना ५ टक्के घरभाडे दिले जात होते. मात्र नंतर ते थांबविण्यात आले. “आजच्या प्रचंड महागाईत हे घरभाडे, किमान वेतन, सानुग्रह अनुदान, मातृत्व लाभ आणि शिष्यवृत्ती यांसारखे हक्क न दिल्यास कामगारांचे जीवन अधिक हालाखीचे होईल,” अशी स्पष्ट प्रतिक्रिया आडम मास्तर यांनी दिली.

कामगार मंत्र्यांची प्रतिक्रिया :
कामगारांची दुरावस्था ऐकून घेतल्यानंतर कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर म्हणाले, “विडी कामगारांचे हक्क अबाधित ठेवले जातील. या उद्योगावर हजारो कुटुंबांची उपजीविका अवलंबून असल्याची मला जाणीव आहे. दिवाळीनंतर याबाबत सविस्तर आढावा घेऊन किमान वेतन, घरभाडे, मातृत्व लाभ, भविष्य निर्वाह निधी यांची प्रभावी अंमलबजावणी होईल यासाठी ठोस निर्णय घेण्यात येईल.”

यावेळी उपस्थित कामगार नेत्यांनी मंत्र्यांचे आश्वासन सकारात्मक पाऊल असल्याचे सांगितले; मात्र निर्णय त्वरित प्रत्यक्षात येण्याची अपेक्षा व्यक्त केली.

Previous Post

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत ३ वाहनांसह १६.२१ लाखांचा मुद्देमाल जप्त…

Next Post

जिल्हाधिकारी यांच्याकडून मोहोळ, माढा व करमाळा तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी…

Related Posts

बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक
इतर घडामोडी

बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक

October 12, 2026
स्थानिक स्वराज्य संस्थांनी १६ ऑक्टोबरपासून पाणीवापरात १० टक्के कपात करावी; जिल्हाधिकारी
इतर घडामोडी

स्थानिक स्वराज्य संस्थांनी १६ ऑक्टोबरपासून पाणीवापरात १० टक्के कपात करावी; जिल्हाधिकारी

October 12, 2026
चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!
इतर घडामोडी

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
Next Post
जिल्हाधिकारी यांच्याकडून मोहोळ, माढा व करमाळा तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी…

जिल्हाधिकारी यांच्याकडून मोहोळ, माढा व करमाळा तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी…

ताज्या बातम्या

माढा तालुक्यातील तुळशी ग्रामस्थांकडून शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीचे स्वागत

माढा तालुक्यातील तुळशी ग्रामस्थांकडून शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीचे स्वागत

October 12, 2026
बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक

बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक

October 12, 2026
एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!

एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026