• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

खा.प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्र्यांना पाठवली कायदेशीर नोटीस.. माफी मागा नाहीतर..

Yes News Marathi by Yes News Marathi
May 14, 2026
in Blog
0
खा.प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्र्यांना पाठवली कायदेशीर नोटीस.. माफी मागा नाहीतर..
0
SHARES
45
VIEWS

सोलापूर : खासदार प्रणिती शिंदे यांचे सातत्याने चारित्र्यहनन करणे,अपमानास्पद, बदनामीकारक आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर करणे, मानहानीकारक विधाने करणे आणि स्त्रीत्वाचा अपमान केल्याप्रकरणी पालकमंत्री जयकुमार भगवानराव गोरे पालकमंत्री यांना प्रणिती शिंदे यांचे वकील ॲड. असीम सरोदे, ॲड. श्रीया आवले, ॲड.आर्या राजेभोसले यांच्यातर्फे कायदेशीर नोटीस पाठविण्यात आलेली आहे.

दिनांक ८ मे २०२६ रोजी सोलापूरमधील प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांना लक्ष्य करून जयकुमार गोरे यांनी एक विधान केले होते. खा.प्रणिती शिंदे यांना सोलापूरमधील स्थानिक विकासापेक्षा फक्त दिल्लीचा रस्ता आणि राहुल गांधी यांच्या घराकडेच लक्ष केंद्रित करतात असा त्या विधानाचा सूर होता. सोलापूरमधील ८२ किलोमीटरच्या मोहोळ-वळसंग रस्त्यावरून सुरू असलेल्या श्रेयवादाच्या लढाईदरम्यान जयकुमार गोरे यांनी हे द्वयर्थी (double meaning) विधान केले. या विधानाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला असून, यामुळे आमच्या पक्षकार खा.प्रणिती शिंदे यांच्या सामाजिक प्रतिष्ठेला हानी पोहोचली आहे. त्या विधानाचा टोन (सूर) आणि ज्या पद्धतीने ते वाक्य म्हटले तो हेतू कलुषित होता. आमच्या अशिलाला फक्त श्री. राहुल गांधी यांच्या घराचा रस्ता माहित आहे असे म्हणतांना जयकुमार गोरे यांचा स्पष्ट हेतू लैंगिक दृष्टिकोनातून टिप्पणी करण्याचा आणि एका महिलेचे चारित्र्यहनन करण्याचा होता. गोरे यांना पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाशी त्यांचे विधान पूर्णपणे अप्रासंगिक आणि अनावश्यक होते असे ॲड. असीम सरोदे म्हणाले .

अलीकडच्या काळात अनेक प्रसंगी जयकुमार गोरे यांनी टीकेच्या मर्यादा ओलांडून माझ्या पक्षकार खा. प्रणिती शिंदे यांना वैयक्तिक दूषणे देण्याच्या पातळीवर लक्ष्य केले आहे. त्यांच्या अनेक अपमानास्पद विधानांनकडे खा. प्रणिती ताईंनी दुर्लक्ष केले. परंतु, इतरांबद्दल बोलण्याची जयकुमार गोरे यांची असंस्कृत पद्धती आणि विशेषतः महिलांबद्दलचा त्यांचा दूषित दृष्टिकोन धक्कादायक रीतीने वाढला आहे. म्हणूनच, आमच्या पक्षकार प्रणिती शिंदे यांनी गोरे यांच्या या असंवेदनशील आणि बेजबाबदार सार्वजनिक वर्तनाबाबत कायदेशीर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आलेले आहे .

महिलांबद्दलचा जयकुमार गोरे यांचा असंवेदनशील, क्रूर दृष्टिकोन आणि सहकारी महिला राजकारण्यांबद्दलचे गैरवर्तन दर्शवणाऱ्या अशा अनेक घटना आणि विधाने विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. त्यापैकी काही घटना खालीलप्रमाणे आहेत:

२० जानेवारी २०२६: एका सार्वजनिक संवादादरम्यान, जयकुमार गोरे यांनी खा. प्रणितीताई शिंदे यांच्या राजकीय भूमिकेबद्दल अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी केली की, “त्या फक्त दोन पावले मागे पडल्या नाहीत, तर ५० फूट खाली पडल्या आहेत आणि तरीही त्यांचे पाय वरच आहेत.”

२० एप्रिल २०२६: सार्वजनिकरित्या आमच्या पक्षकारांच्या बौद्धिक क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि त्यांच्या विधानांचे वर्णन ‘बौद्धिक घसरण’ असे केले.

१४ एप्रिल २०२६: जिल्हा नियोजन समिती (DPC) निधी वाटपाबाबत बोलताना जयकुमार गोरे यांनी बदनामीकारक तुलना केली आणि हा निधी सोलापूरसाठी आहे, ‘पाकिस्तानसाठी नाही’ असे म्हणून अप्रत्यक्षपणे खा. प्रणिती शिंदे यांच्या देशप्रेमावर शंका उपस्थित केली.

जयकुमार गोरे यांचे वर्तन, देहबोली (Body Language) आणि चेहऱ्यावरील हावभाव हे नेहमीच उद्धट, अनादरयुक्त आणि असंस्कृत राहिलेले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या विविध व्हिडिओंमध्ये असे दिसून आले आहे की, ही अपमानास्पद विधाने करताना त्यांच्या देहबोलीतून एक प्रकारचा द्वेषयुक्त ‘आंतरीक आनंद’ आणि पश्चात्तापाचा अभाव दिसून येतो. त्यांच्या चेहऱ्यावरील इतरांच्या बद्दल तुच्छतापूर्ण हावभाव आणि उपहासात्मक सूर यातून निकोप लोकशाही चर्चेत भाग घेण्याऐवजी, माझ्या पक्षकार खा. प्रणिती शिंदे यांना सार्वजनिकरित्या अपमानित करण्याचा जयकुमार गोरे यांचा जाणीवपूर्वक हेतू दिसतो आणि त्यांची विधाने ही ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा’ गैरवापर आहेत असेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आलेले आहे.

जयकुमार गोरे यांची बोलण्याची शैली ही आत्मकेंद्री,वर्चस्ववादी आणि हेराफेरीपूर्ण (manipulative) आहे, त्यामुळे ते इतरांना कमी लेखून स्वतःला सगळ्या घडामोडींच्या केंद्रस्थानी ठेवण्याची त्यांची प्रवृत्ती असल्याचा, नेहमी विषयाला स्वतःकडे वळवण्याची आणि इतरांच्या कामगिरीला कमी लेखण्याची एक ठराविक वागणूक प्रक्रिया त्यांचा स्थायीभाव झालेला आहे
असा उल्लेख नोटीसमध्ये करण्यात आला आहे. राजकारणातील महिलांप्रती सभ्यता, शिष्टाचार आणि नम्रता राखण्याच्या त्यांच्या जबाबदाऱ्या समजून घेऊन जयकुमार गोरे हे स्वतःमध्ये सुधारणा करतील अशी आशा खा. प्रणिती शिंदे यांना असल्याचे त्यांनी नोटीसमध्ये म्हटले आहे.

भारतीय संविधानाचे कलम १९(१)(अ) जरी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार देत असले, तरी ते ‘सभ्यता’, ‘नैतिकता’ आणि ‘बदनामी’ या संदर्भातील वाजवी निर्बंधांच्या अधीन आहे. जयकुमार गोरे यांचे वर्तन या तत्त्वांचे गंभीर उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे स्त्रीत्वाचा अपमान, महिलेच्या विनयशीलतेचा अपमान, फौजदारी मानहानी (गुन्हेगारी बदनामी), खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्याच्या उद्देशाने केलेली तुमची विधाने, नैतिकतेच्या संदर्भात जयकुमार गोरे यांनी गैरवर्तन केले आणि एक मंत्री व लोकसेवक म्हणून सार्वजनिक नैतिकता आणि सभ्यतेच्या वागणुकीचे पालन करण्यात सातत्याने अपयशी ठरले असे आरोप नोटिसीमधून करण्यात आलेले आहेत.तसेच खा. प्रणिती शिंदे यांच्याबद्दल सततचा आकस आणि दुर्भावना ठेऊन काम करणे यातून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी संविधानाच्या कलम १६४(३) अंतर्गत मंत्री म्हणून घेतलेल्या शपथेचे उल्लंघन केले आहे असा उल्लेख सुद्धा नोटिसीमधून करण्यात आलेला आहे.

नोटीस मिळाल्यापासून सात (७) दिवसांच्या आत जयकुमार गोरे यांनी खा. प्रणिती शिंदे यांची बिनशर्त सार्वजनिक माफी मागावी आणि सामाजिक माध्यमांमध्ये तसेच मुद्रित माध्यमांमध्ये (प्रिंट मीडिया) सार्वजनिक माफी प्रकाशित करावी, खा.प्रणिती शिंदे यांच्याविरुद्ध आणि सर्वसाधारणपणे महिलांविरुद्ध यापुढे कोणतीही अपमानास्पद किंवा बदनामीकारक विधाने करणे त्वरित थांबवावे अन्यथा न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय उरणार नाही असे या कायदेशीर नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आल्याचे ॲड. श्रीया आवले यांनी सांगितले.

Previous Post

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा : डॉ. बालाजी जाधव

Next Post

TOP 25 । सोलापूरकरांवर गडकरी प्रसन्न…जेवढ्या केल्या मागण्या तेवढ्या मंजूर…!

Related Posts

समृद्धी क्रीडा सेवा पुरस्कार जाहीर..खो-खोपटू रामजी कश्यप व जलतरणपटू श्रावणी सूर्यवंशी खेळाडू पुरस्काराचे मानकरी
Blog

समृद्धी क्रीडा सेवा पुरस्कार जाहीर..खो-खोपटू रामजी कश्यप व जलतरणपटू श्रावणी सूर्यवंशी खेळाडू पुरस्काराचे मानकरी

August 26, 2026
सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.
Blog

सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

August 25, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत
Blog

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे ‘तीज री रीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!
Blog

सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे ‘तीज री रीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!

August 23, 2026
ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी
Blog

ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी

August 22, 2026
पुणे-सोलापूर महामार्गावर स्विफ्टचा अपघात; दोघे गंभीर
Blog

पुणे-सोलापूर महामार्गावर स्विफ्टचा अपघात; दोघे गंभीर

August 21, 2026
Next Post
TOP 25 । सोलापूरकरांवर गडकरी प्रसन्न…जेवढ्या केल्या मागण्या तेवढ्या मंजूर…!

TOP 25 । सोलापूरकरांवर गडकरी प्रसन्न…जेवढ्या केल्या मागण्या तेवढ्या मंजूर…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026