अविनाश व्यंकटेश कुलकर्णी : सोलापुरातील 1995 मध्ये बंद पडलेल्या लक्ष्मी विष्णू मिलची चिमणी अखेर गुरुवारी सकाळी जेसीबी यंत्राच्या मदतीने जमीनदोस्त करण्यात आली. शंभर वर्षांपूर्वी उभारलेली ही चिमणी जमीनदोस्त झाल्यामुळे लक्ष्मी विष्णू मिलचे अस्तित्व दाखवणारी शेवटची ओळख आता इतिहासजमा झाली. त्यामुळे एकेकाळी गिरणगाव म्हणून राज्यात प्रसिद्ध असलेल्या सोलापुरातील नागरिक व कामगार वर्गाला निश्चितपणे वाईट वाटले असणार ,यात शंका नाही. ऐतिहासिक वास्तू म्हणून या चिमणीचे जतन व्हावे असा इंटॅक्टचा शेवटपर्यंत प्रयत्न होता परंतु चिमणी नैऋत्य दिशेने थोडी कलल्या ने धोकादायक स्थिती निर्माण झाली होती. अखेर ,50मीटर उंचीची ही चिमणी जमीनदोस्त करण्यात आली.
लक्ष्मी मिल 1898मध्ये व विष्णू मिल 1910मध्ये उभारून कापड निर्मितीस मोठ्या उत्साहाने प्रारंभ झाला होता. 1956पर्यंत ही कापड गिरणी दि बॉम्बे कंपनीच्या मालकीची होती. त्यानंतर मथुरा दास विस नजी यांनी ही गिरणी ताब्यात घेऊन 1969पर्यंत यशस्वीपणे चालवून दाखवली. 17सप्टेंबर 1969मध्ये टेस्ट क्रिकेट खेळाडू माधवराव आपटे यांनी ही गिरणी आपटे ग्रुपच्या देखरेखीखाली चालवून गिरणीला यशोशिखरावर नेले. या गिरणीची सिफॉन साडी व टेरी लीन साडी दर्जेदार व गुणवत्तापूर्ण असल्यामुळे महिला वर्गात अतिशय लोकप्रिय ठरली .बेलतींजी कॅनव्हास चे उत्पादन देशातील मोजक्या कापड गिरण्या मध्ये होत असे. लक्ष्मी विष्णू मिलचा त्यात समावेश होता. तंबू निर्मितीसाठी लागणारे कॅनव्हास ही मिलमध्ये तयार होत असे. लक्ष्मी विष्णूची उत्पादने रशियात मोठ्या प्रमाणात निर्यात केली जात होती. त्यामुळे या गिरणील सोन्याचे दिवस पाहता आले. रशियाचे विभाजन झाले व या गिरणीच्या निर्यातीला फटका बसून गिरणी ची हक्काची बाजारपेठ हातून गेली. एस कुमार या नावजलेल्या ब्रँडच्या साड्या लक्ष्मी विष्णू मिलमध्ये उत्पादित होणाऱ्या असत. लक्ष्मी विष्णूच्या शो रूममध्ये साड्या घेण्यासाठी महिलांची झुंबड उडत असे.
1987 पर्यंत ही गिरणी आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत होती.त्यानंतर या गिरणी ल आर्थिकदृष्ट्या घरघर लागली. रशियाची निर्यात बंद झाल्यामुळे गिरणी ल मोठा आर्थिक फटका बसला. नवीन बाजारपेठ शोधण्यात व्यवस्थापनाचे दुर्लक्ष झाले. भिवंडी , इचलकरंजी आदी ठिकाणच्या यंत्रमाग वर कापड निर्मिती जोरात सुरू झाल्यामुळे व यंत्रमाग कामगारांना पी एफ व अन्य सुविधांसाठी येणारा खर्च नसल्याने यंत्रमाग कापड संयुक्त गिरण्यांच्या तुलनेत बाजारात स्वस्त मिळू लागले. त्यामुळे मुंबई , सोलापूर आदी ठिकाणच्या कापड गिरण्या ना विक्री घातल्याने मोठा आर्थिक फटका बसला. विक्रीत झालेली घट , अबकारी क रात झालेली वाढ, जुनी यंत्रसामुग्री आदी विविध कारणांमुळे लक्ष्मी विष्णू मिलचा संचित तोटा साधारण दीडशे कोटींच्या घरात गेला. फेब्रुवारी 1995पासून गिरणी तील उत्पादन पूर्णपणे थांबले आणि जुनी मिलनंत र l बंद 1964 l या गिरणीनेही आपला शेवटचा श्वास सोडला.
लक्षी. विष्णूच्या कामगारांना बोनस मिळण्यासाठी भाजपचे तत्कालीन आमदार स्व. लिंग राज वल्ल्याल व माकपचे माजी आमदार नरसय्या अडम मास्तर यांनी उपोषण करून संप घडवून आणला होता. बोनस साठी गिरणीच्या आवारात शिरलेल्या कामगारांवर पोलिसांनी लाठीमार केला .त्यामुळे चप्पल सोडून कामगारांनी तेथून पळ काढला होता. गिरणी परिसर कमगरांच्या चापलानी भरून गेल्याचे दृश्य आम्ही स्थानिक वार्ताहर यांनी पाहिले होते.
ही गिरणी सहकारी तत्त्वावर सुरू करावी असा प्रस्ताव माजी खासदार गंगाधर पंत कुचं न यांनी शासनाकडे दिला होता तो मान्य झाला नाही. शासनाच्या वस्त्रोद्योग महामंडळाने ही गिरणी ताब्यात घेऊन चालवावी असाही प्रयत्न झाला.तोही निष्फळ ठरला. अखेर गिरणीचे 3500कामगार बेका रीच्या खाईत लोटले गेले. राज्यातील एक कर्तृत्व संपन्न नेत्याशी माधवराव आपटे यांच्याशी मैत्री होती परंतु या नेत्याने गिरणी पुन्हा सुरू करण्यात रस दाखवला नाही , याची सोलापूरकरांना आजही खंत वाटते. गिरणी सुरू करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी आस्था दाखवली नाही ,याचे वाईट वाटते. गिरणी तील कापड विभाग सोडा किमान स्पिनिंग युनिट सुरू करून 700ते 800कामगारांना रोजगार देता आला असता. गिरणीच्या जागेवर आता आधुनिक पद्धतीच्या सदनिका उभ्या आहेत.