येस न्युज मराठी नेटवर्क : आजपासून ब्रिक्स देशांच्या वार्षिक बैठकीला सुरुवात होणार आहे. ब्रिक्स देशांच्या आजच्या बैठकीत प्रामुख्याने अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या वर्षीच्या बैठकीचे अध्यक्षपद हे भारताकडे असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या बैठकीत भाग घेणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या व्यतिरिक्त चीनचे राष्ट्रपती शी झिनपिंग, रशियाचे पुतिन, ब्राझिलचे बोलसोनारो आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष रामाफोसो हे सामिल होणार आहेत.
भारतीय पंतप्रधानांच्या निमंत्रणावरुन चीनचे राष्ट्रपती शी झिनपिंग हे या परिषदेत व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून भाग घेणार आहेत असं चीनच्या परराष्ट्र खात्यानं स्पष्ट केलं आहे. या वर्षी ब्रिक्स परिषदेची थीम ही “Intra-BRICS cooperation for continuity, consolidation and consensus” अशी आहे.