मार्कंडेय रथोत्सवासाठी बुधवारी तेलंगणाचे प्रमुख मंत्री, नेते येणार

0
15

सोलापूर : पूर्व भागातील मार्कंडेय महामुनींच्या रथोत्सवासाठी भारत राष्ट्र समितीचे नेते, तेलंगणाचे माजी उपमुख्यमंत्री महमंद अली, अर्थमंत्री हरीश राव यांच्यासह चार नेते बुधवारी सोलापुरात येणार असल्याची माहिती माजी नगरसेवक नागेश वल्याळ यांनी होतील. दिली. रथोत्सवावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्याची परवानगी पोलिसांकडे मागितली होती. पोलिसांनी परवानगी नाकारल्याचे वल्याळ यांनी सांगितले.

मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव बुधवारी होणार आहे. वल्याळ म्हणाले, भारत राष्ट्र समिती पक्षाचे तेलंगणातील नेते आणि राज्यातील पदाधिकारी बुधवारी दुपारी दोन वाजता सोलापुरात येत आहेत. यामध्ये मोहम्मद अली, हरीश राव, पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी कलवकुंथला वंशीधर राव, पद्मशाली समाजाचे नेते आमदार एन. रमणा यांच्यासह राज्यभरातील पदाधिकाऱ्यांचा समावेश असेल, हे सर्व नेते दुपारी दोन वाजता मार्कडेय मंदिर आणि स्थोत्सव मार्गात सहभागी दरम्यान, बीआरएसचे प्रमुख तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत सोलापुरात लवकरच जाहीर सभा होणार आहे. अर्थमंत्री हरीश राव आणि इतर नेते बुधवारी सायंकाळी सोलापुरातील सभास्थळांची पाहणी करणार असल्याचेही वल्याळ म्हणाले.