• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या आय टी पार्क उभारण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री डॉ सुरेश खाडे

Yes News Marathi by Yes News Marathi
July 15, 2023
in इतर घडामोडी
0
सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या आय टी पार्क उभारण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री डॉ सुरेश खाडे
0
SHARES
0
VIEWS

सांगली ( सुधीर गोखले) – जिल्ह्यात आय. टी. पार्क उभारण्याचा माझा मानस असून, त्यासाठी आवश्यक पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन व प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथे दिली.जिल्ह्यात आय. टी. पार्क उभारणीबाबत आयोजित प्राथमिक बैठकीत ते बोलत होते. राज्यात माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवांच्या सर्वंकष व्यापक विस्तारासाठी माहिती तंत्रज्ञान उद्याने, सॉफ्टवेअर उत्पादने, डेटा सेंटर तसेच नाविण्यपूर्ण तंत्रज्ञान त्याचप्रमाणे एकात्मिक माहिती तंत्रज्ञान शहरे विकसीत करण्यावर भर देण्यात येत आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे नवीन माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण २०२३ लागू करण्यात आले आहे. या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, महापालिका आयुक्त सुनील पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी तथा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल, मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह आय.टी. क्षेत्रातील विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे नवीन माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण २०२३ अंतर्गत जागतिक स्तरावरील माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा उपक्रमांकरिता धोरणात्मक निर्णय, स्पर्धात्मक विकास व व्यवसायपूरक वातावरण निर्मिती करण्यात येत आहे.

उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रांकरिताही पूरक वातावरण निर्मिती करण्यात येत आहे. या क्षेत्राच्या वाढीकरिता उच्च रोजगारक्षम, प्रतिभावान व गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ विकसीत करण्यात येणार आहे. तसेच या धोरणांतर्गत मुद्रांक शुल्क माफी, ऊर्जा सुसूत्रीकरणाचे लाभ, विद्युत शुल्क, प्रमाणपत्र सहाय्य, बाजार विकास सहाय्य, पेटंट संबंधित सहाय्य आदि क्षेत्र विशिष्ट प्रोत्साहने (इन्सेंटीव्ह) दिली जाणार आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी सांगली शहर व जिल्ह्यात आय. टी. क्षेत्रातील व्यवसायांचे स्वागत असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, आगामी १० वर्षानंतरची गरज ओळखून आय. टी. क्षेत्रातील व्यवसायांना आवश्यक पायाभूत सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून दिल्या जातील. हिंजेवाडीच्या आय. टी. हब प्रमाणे सांगली शहरातही आय. टी. पार्क उभारण्यासाठी १० एकर शासकीय किंवा खाजगी जागा उपलब्धीसाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. नामांकित दर्जेदार आय. टी. हब प्रमाणे यामध्ये सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येतील. जागेप्रमाणेच अखंडित वीजपुरवठा आणि इंटरनेट सुविधा, पाणी, कुशल मनुष्यबळ, कर्मचारी वाहतूक सुविधा, उपहारगृह, सुरक्षा अशा आवश्यक सर्व बाबींचा विचार करून आराखडा तयार केला जाईल. त्यामुळे आय. टी. क्षेत्रातील कंपन्यांनी सांगली जिल्ह्यात आपला उद्योग सुरू करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, जिल्ह्यात उद्योग पूरक वातावरण तयार करण्यात येत असून, शासनाच्या उद्योग स्नेही धोरणामुळे तसेच, जिल्ह्यात नव्याने आय. टी. पार्क निर्माण करण्यात येत असल्याने या क्षेत्रातील कंपन्यांना संधी मिळण्याबरोबरच जिल्ह्यातील तरुणांनाही रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास डॉ. खाडे यांनी यावेळी व्यक्त केला. राज्य शासनाने नव्याने माहिती तंत्रज्ञान व सहाय्यभूत सेवा धोरण जाहीर केले आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात आय. टी. पार्क साठी या क्षेत्रातील उद्योजकांच्या अपेक्षापूर्तीसाठी प्रशासन आवश्यक सर्व मदत व सहकार्य करेल, असे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी बैठकीत सांगितले. यावेळी सांगली व अन्य जिल्ह्यातील दहाहून अधिक उद्योजकांनी त्यांचे मत मांडत आय. टी. पार्कसाठी व उद्योग उभारणीसाठी शासन व प्रशासनाकडून असणाऱ्या अपेक्षा व्यक्त केल्या. तसेच, त्यांच्या अडचणी मांडल्या.   

Tags: Dr. Suresh KhadeGuardian MinisterIT parkSangli District
Previous Post

विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीकडे लक्ष द्या – सिईओ दिलीप स्वामी

Next Post

चंद्रयान ३ ची यशस्वी झेप; आजच्या गवसणीमागे वीस वर्षे परिश्रमाची…

Related Posts

विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …
इतर घडामोडी

विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …

July 22, 2026
श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत
इतर घडामोडी

श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत

July 20, 2026
पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी
इतर घडामोडी

पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी

July 18, 2026
मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

July 18, 2026
इतर घडामोडी

चंद्रभागा नदीपात्रात बचावकार्यासाठी १८० आपदा मित्रांचे पथक सज्ज

July 17, 2026
पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश
इतर घडामोडी

पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश

July 17, 2026
Next Post
चंद्रयान ३ ची यशस्वी झेप; आजच्या गवसणीमागे वीस वर्षे परिश्रमाची…

चंद्रयान ३ ची यशस्वी झेप; आजच्या गवसणीमागे वीस वर्षे परिश्रमाची...

ताज्या बातम्या

उजनी धरणातील पाणीसाठा 53.75 टक्क्यांवर; कालव्यातून सिंचनासाठी पाणी सुरू

उजनी धरणातील पाणीसाठा 53.75 टक्क्यांवर; कालव्यातून सिंचनासाठी पाणी सुरू

July 22, 2026
आयटी पार्कसाठी पाटबंधारे विभागाची जमीन एमआयडीसीला देण्याचे आदेश

आयटी पार्कसाठी पाटबंधारे विभागाची जमीन एमआयडीसीला देण्याचे आदेश

July 22, 2026
माउलीच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट

माउलीच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट

July 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026