• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कॉपीमुक्त अभियानाची कडक अंमलबजावणी; सर्व ती आवश्यक यंत्रणेचा वापर करावा

Yes News Marathi by Yes News Marathi
February 5, 2025
in इतर घडामोडी
0
कॉपीमुक्त अभियानाची कडक अंमलबजावणी; सर्व ती आवश्यक यंत्रणेचा वापर करावा
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि. 5 (जिमाका):- फेब्रुवारी मार्च 2025 मध्ये होणाऱ्या माध्यमिक इयत्ता 10 वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12 वी शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी दक्षता समितीची सभा जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा दक्षता समिती, सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर यांच्या उपस्थितीत आज दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, सात रस्ता, सोलापूर येथे पार पडली.

सदर बैठकीमध्ये शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, सोलापूर तथा सचिव जिल्हा दक्षता समिती यांनी जिल्ह्यामध्ये इयत्ता 12 वीची 121 व इयत्ता 10 वीची 184 परीक्षा केंद्रे आहेत. याबाबत माहिती दिली. सदर परीक्षेसाठी जिल्ह्यात इयत्ता 12 वी साठी 11 वी व इयत्ता 10 वीसाठी 15 परिरक्षक केंद्र (कस्टडी) आहेत. त्यावर गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या परीक्षांसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांनी दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या राज्यस्तरीय व्ही.सी.मध्ये 1982 च्या कायद्याची कॉपीमुक्त अभियानाची कडक अंमलबजावणी करणेसाठी सर्व ती आवश्यक यंत्रणेचा वापर करावा. व याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत.
इयत्ता 12 वीची परीक्षा दिनांक 11 फेब्रुवारी 2025 ते 18 मार्च 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे. तसेच इयत्ता 10 वीची परीक्षा दिनांक 21 फेब्रुवारी 2025 ते 17 मार्च 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे.

इयत्ता 12 वीसाठी 55 हजार 879 व इयत्ता 10 वीसाठी 65 हजार 585 इतके विद्यार्थी प्रविष्ठ होत आहेत. सदर परीक्षा केंद्रांसाठी केंद्रसंचालक नियुक्ती करण्यात आलेले असून जिल्ह्यात इयत्ता 12 वीसाठी 34 व इयत्ता 10 वीसाठी 47 संवेदनशील केंद्रे आहेत अशी माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, सोलापूर यांनी बैठकीमध्ये दिली. या परिक्षा केंद्रावर विशेष पोलीस बंदोबस्त व बैठे पथक नेमण्यात आलेले आहे. या परिसरात 144 कलम लागू करणेबाबत जिल्हाधिकारी यांनी पोलीस आयुक्त शहर व पोलीस अधीक्षक, ग्रामीणच्या अधिकाऱ्यांना सुचना दिल्या. संवेदनशील केंद्रावर व ज्याठिकाणी मास कॉपी चालते त्याठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून व्हिडीओग्राफीसाठी व्हिडीओग्राफर उपलब्ध करून देण्यात येतील असे सांगितले.

तालुकास्तरावर जिल्हाधिकारी यांचेमार्फत तहसिलदार, नायब तहसिलदार यांचेकडून फिरते पथक व बैठे पथक नियुक्त करण्यात येतील त्यामध्ये ग्रामसेवक, तलाठी यांची व इतर आवश्यक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल. तर मुख्य कार्यकारी अधिकारी, यांचेमार्फत जिल्हा परिषदेतील खातेप्रमुखांची फिरते पथकामध्ये नियुक्त करण्यात येईल.

संवेदनशील परीक्षा केंद्र अथवा गाव जेथे 144 कलमाची कडकपणे अंमलबजावणी करण्यात येईल व गावातील प्रतिष्ठित 4 ते 5 लोकांचे संपर्क क्रमांक घेवून त्यांचेकडून गावातील याबात माहिती घेतली जाईल. एका ठिकाणी कंट्रोल रूम तयार करण्यात येईल. ज्याठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद विभाग, पोलीस विभाग व शिक्षण विभाग यांचे प्रतिनिधी नियुक्ती करण्यात येतील. यामार्फत जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रावर विशेषत: संवेदनशील केंद्रावर लक्ष ठेवण्यात येईल. ज्या परिक्षा केंद्रावर गैरकृत्य आढळून आल्यास फिरते पथकास व पोलीस विभागास माहिती दिली जाईल व संबंधितावर पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

तसेच परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी विशेष आरोगय सेवा पुरविणेबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सुचना देण्यात आली. त्यादृष्टीने आवश्यक असलेल्या परीक्षा केंद्रावर बैठे आरोगय पथक व तालुक्यात एक फिरते आरोग्य पथक नियुक्त करण्यात यावे असे जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले.
या परीक्षांसाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट), वेळापूर, शिक्षणाधिकारी माध्यमिक, प्राथमिक, योजना जिल्हा परिषद, सोलापूर यांचेही फिरते पथक सक्रिय राहील अशा सुचना दिलेल्या आहेत.

या दक्षता समितीच्या बैठकीसाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस आयुक्त शहर व पोलीस अधिक्षक ग्रामीण यांचे प्रतिनिधी, प्राचार्य जिल्हा परिषद, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, सहा. शिक्षण उपनिरीक्षक उच्च माध्यमिक सोलापूर उपस्थित होते.
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, सोलापूर तथा सचिव जिल्हा दक्षता समिती यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Previous Post

सोलापूर विद्यापीठात आ. सुभाष देशमुख यांच्या हस्ते एनएसएस शिबिराचे उद्घाटन

Next Post

सिध्देश्वर मंदिरासमोरील शौचालय हटवा; वीरशैव व्हिजनची मनपा आयुक्तांकडे मागणी

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
सिध्देश्वर मंदिरासमोरील शौचालय हटवा; वीरशैव व्हिजनची मनपा आयुक्तांकडे मागणी

सिध्देश्वर मंदिरासमोरील शौचालय हटवा; वीरशैव व्हिजनची मनपा आयुक्तांकडे मागणी

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026