• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर जिल्ह्यात अनधिकृत पुतळे, स्मारके व ध्वजस्तंभ उभारणीवर कडक कारवाई

Yes News Marathi by Yes News Marathi
April 10, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापूर जिल्ह्यात अनधिकृत पुतळे, स्मारके व ध्वजस्तंभ उभारणीवर कडक कारवाई
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर, दि. ९: – जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय, सोलापूर यांनी परिपत्रक जारी करून सार्वजनिक ठिकाणी पुतळे, स्मारके व ध्वजस्तंभ उभारणीसंदर्भात शासन नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. अनधिकृत उभारणीवर तात्काळ कारवाई करून कायदा व सुव्यवस्था राखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

*नव्याने पुतळा उभारण्यासाठी आवश्यक बाबी
शासन निर्णयानुसार पुतळा उभारणीसाठी खालील कागदपत्रे व परवानग्या अनिवार्य आहेत:

  • नियमानुसार अर्ज
  • जागेच्या मालकी हक्काचे प्रमाणपत्र / ना हरकत प्रमाणपत्र (NOC)
  • ग्रामपंचायत/नगरपरिषद ठराव व मुख्य कार्यकारी अधिकारी/मुख्याधिकारी यांचा अभिप्राय
  • पोलीस विभागाचा अहवाल (कायदा व सुव्यवस्था बाबत)
  • सार्वजनिक बांधकाम विभाग अथवा संबंधित प्राधिकरणाची परवानगी
  • पुतळ्याचा आराखडा, मोजमाप व कला संचानालयाचे प्रमाणपत्र
  • देखभाल जबाबदारीचा स्थानिक प्राधिकरणासोबतचा लेखी करार
  • जिल्हास्तरीय पुतळा समितीची अंतिम मंजुरी
  • ग्रामसभा घेऊन स्थानिक नागरिकांचा अहवाल

*पोलीस पाटील, ग्रामपंचायत अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांची जबाबदारी

  • अनधिकृत पुतळा उभारणीची माहिती तात्काळ वरिष्ठांना लेखी स्वरूपात देणे बंधनकारक.
  • माहिती न दिल्यास पोलीस पाटील यांच्यावर महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम १९६७ नुसार बडतर्फीची कारवाई.
  • ग्रामपंचायत अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांच्यावर प्रशासकीय कारवाई गटविकास अधिकारी व तहसिलदार करतील.

*ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील कलम ३९ नुसार कार्यवाही

  • अनधिकृत पुतळा उभारणीची पूर्वकल्पना न दिल्यास संबंधित ग्रामपंचायत सदस्यांविरुद्ध अपात्रतेचा प्रस्ताव गटविकास अधिकारी यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करावा.

*अनधिकृत पुतळा काढण्याबाबत मार्गदर्शक सूचना

१. माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी, पोलीस अधिकारी, तहसिलदार व गटविकास अधिकारी यांनी एका तासात संयुक्त भेट देऊन चार तासांत पुतळा हटवावा.
२. जागेच्या मालकीची निश्चिती न करता कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तात्काळ कारवाई करावी.
३. पुतळा बसविणाऱ्यांची माहिती मिळविण्यासाठी व्हिडीओग्राफी व ड्रोनद्वारे निगराणी करावी; २४ तासांत गुन्हा दाखल करावा.
४. पोलीस, महसूल व ग्रामविकास विभागांनी संयुक्त बैठक घेऊन हटविण्याची रूपरेषा ठरवावी.
५. अनधिकृत पुतळे निर्मिती कारखान्यांवर गुन्हे दाखल करून बंद करण्याची कार्यवाही करावी; कारखानदारांकडून जिल्हाधिकारी परवानगीशिवाय पुतळा न सुपूर्त करण्याचे बंधपत्र घ्यावे.
६. हटविलेला पुतळा जवळच्या शासकीय गोदामात सुरक्षित ठेवावा.
७. गावांमध्ये पूर्वकल्पना मिळाल्यास संयुक्त बैठक घेऊन नागरिकांना अनधिकृत उभारणीपासून परावृत्त करावे; विरोध करणाऱ्यांविरुद्ध कारावास व दंडात्मक कारवाई होऊ शकते.
८. उपविभागीय अधिकारी व पोलीस अधिकारी यांनी दरमहा १० तारखेपूर्वी कार्यवाहीचा अहवाल जिल्हादंडाधिकारी व पोलीस अधीक्षकांना सादर करावा.

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी स्वाक्षरी केलेल्या या परिपत्रकानुसार अनधिकृत पुतळे, स्मारके व ध्वजस्तंभ उभारणीवर कठोर कारवाई होणार आहे. शासन नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई होईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Previous Post

उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रेल्वेकडून पंढरपूर-तिरुपती, बंगळुरू कॅन्टोनमेंट-कलबुरगि आणि SMVT बंगळुरू-बीदर या विशेष गाड्यांची सेवा सुरूच राहणार

Next Post

खत कंपन्यांनी युरिया व डीएपी खताचा 100 टक्के संरक्षित साठा ठेवणे बंधनकारक- जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

Related Posts

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!
इतर घडामोडी

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!

October 14, 2026
उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!
इतर घडामोडी

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
Next Post
खत कंपन्यांनी युरिया व डीएपी खताचा 100 टक्के संरक्षित साठा ठेवणे बंधनकारक- जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

खत कंपन्यांनी युरिया व डीएपी खताचा 100 टक्के संरक्षित साठा ठेवणे बंधनकारक- जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

ताज्या बातम्या

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026