सोलापूरचं ‘पार्क’ मैदान.. शिवाजी पार्कप्रमाणे ‘या’ कारणाने गाजणार…

0
84

शिवाजी सुरवसे / सोलापूर : सोलापूरचे पार्क मैदान अर्थात इंदिरा गांधी क्रिकेट स्टेडियम वादाच्या भोवऱ्यात सापडणार आहे ! सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या माध्यमातून सुमारे 18 कोटी रुपये खर्चून हे क्रिकेटचं मैदान हिरवंगार करण्यात आल आहे. त्यामुळे इथे फिरण्यासाठी.. इतर खेळांसाठी तसेच  कोणतेही कार्यक्रम घेण्यासाठी महापालिकेने बंदी घातली आहे. विजयादशमी अर्थात दसऱ्या दिवशी या पार्क मैदानावर दरवर्षी सोलापूरकर रावण दहन करतात. शिवाय इथेच मैदानाच्या कडेला असलेल्या शमीच्या झाडाला जाण्यासाठी पार्क मैदानाचा दरवर्षी वापर केला जातो. दोन वर्ष कोरोनाचे संकट असल्यामुळे कोणताच सणसमारंभ झाला नाही त्यामुळे यंदाचा पार्क मैदानावरील होणारा रावण दहनाचा  कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे त्यामुळे मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे च्या शिवसेनेचा दसरा मेळावा होणार की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा होणार हा प्रश्न जसा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे त्याचप्रमाणे सोलापूरचे पार्क मैदान रावण दहन होणार की नाही या मुद्द्यावरून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. आता महापालिकेच्या भूमिकेकडे लक्ष लागली आहे