• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर जिल्हा परिषद सज्ज..वरिष्ठ पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा पालखी मार्गावर पाहणी दौरा

Yes News Marathi by Yes News Marathi
July 16, 2026
in Blog
0
सोलापूर जिल्हा परिषद सज्ज..वरिष्ठ पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा पालखी मार्गावर पाहणी दौरा
0
SHARES
2
VIEWS

आषाढी वारी २०२६ च्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यात येणाऱ्या लाखो वारकरी भाविकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सोलापूर जिल्हा परिषदेचे संपूर्ण प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. जिल्हा परिषदेचे प्रमुख पदाधिकारी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आज पालखी मार्ग, मुक्काम तळे आणि रिंगण सोहळ्याच्या ठिकाणांचा पाहणी दौरा केला.

सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समितीचे सभापती इंद्रजीत पवार यांच्या उपस्थितीततसेच मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी मार्ग, मुक्काम तळे आणि रिंगण स्थळांची संयुक्त पाहणी करण्यात आली.तसेच शिक्षण व आरोग्य समिती सभापती चेतनसिंह केदार आणि महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती अमृता वाघे यांनी प्रत्यक्ष मैदानावर उतरून तयारीचा आढावा घेतला.


याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) सूर्यकांत भुजबळ, जिल्हा आरोग्य अधिकारी सतीश कोपूरवाड , कार्यकारी अभियंता बांधकाम एस व्ही कुलकर्णी,माळशिरस चे गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे जिल्हा परिषद सदस्य धनाजी जाधव यांच्यासह सर्व खात्यांचे विभाग प्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.
धर्मपुरी ते वाखरी पालखी तळ आणि रिंगण सोहळा स्थळांची सूक्ष्म पाहणी ​सकाळी ठीक ९.०० वाजता माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी येथून याद्वारे सुरुवात झाली झाला. धर्मपुरी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी विसावा तळ, पुरदावडे आणि खुडूस येथील प्रसिद्ध गोल रिंगण सोहळा स्थळ तसेच पुरदावडे प्राथमिक आरोग्य केंद्राची सविस्तर पाहणी करण्यात आली. वेळापूर येथील पालखी मुक्काम तळावर वारकऱ्यांसाठी उभारण्यात येत असलेल्या अत्याधुनिक जर्मन हँगर शौचालय आणि स्नानगृहांची तपासणी करून तेथील कामाचा दर्जा तपासण्यात आला.
बोंडले, बोरगाव व पिराची कुरोली:बोंडले येथील श्री चांगा वटेश्वर महाराज पालखी मुक्काम तळ, तसेच बोरगाव व पिराची कुरोली येथील श्री संत तुकाराम महाराज पालखी तळाची पाहणी करण्यात आली.


वारी काळात लाखो भाविकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे म्हणून उभारण्यात आलेल्या पाणी टँकर फीडिंग पॉईंट्सची प्रत्यक्ष पाहणी करून पाणी वितरणाचे नियोजन समजून घेण्यात आले.
भंडीशेगाव येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत सोपान काका महाराज पालखी तळ आणि पंढरपूर जवळील वाखरी येथील भव्य गोल रिंगण सोहळा स्थळाची पाहणी करून तयारीचा अंतिम आढावा घेण्यात आला.


केवळ भौतिक सुविधांवरच भर न देता, या वारीला ‘पर्यावरणपूरक वारी’चे रूप देण्यासाठी जिल्हा परिषदेने पावले उचलली आहेत. या दौऱ्यादरम्यान पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सर्व प्रमुख पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या हस्ते विविध पालखी तळांवर वृक्षारोपण करण्यात आले. वारीच्या निमित्ताने संपूर्ण पालखी मार्गावर मोठ्या प्रमाणावर झाडे लावून त्यांचे जतन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.


नियोजनबद्ध दौऱ्यामुळे पालखी मार्गावरील सोयी-सुविधांच्या कामांना मोठी गती मिळाली असून, ‘पाऊले चालती पंढरीची’ म्हणत येणाऱ्या लाखो वैष्णवांच्या स्वागतासाठी सोलापूर जिल्हा परिषद आता पूर्णपणे सज्ज झाली आहे.

Previous Post

माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

Next Post

विठ्ठलाकडे जाणारा प्रवास की स्वतःला सापडण्याचा? – अमित जोशी

Related Posts

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
Blog

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी
Blog

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026
कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!
Blog

कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

October 13, 2026
दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !
Blog

दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !

October 13, 2026
श्रीनिअंबा नृत्यालय सोलापूर आयोजित श्रीनिअंबा नवरात्री नवदुर्गा नृत्य संकीर्तन २०२६
Blog

श्रीनिअंबा नृत्यालय सोलापूर आयोजित श्रीनिअंबा नवरात्री नवदुर्गा नृत्य संकीर्तन २०२६

October 13, 2026
खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता
Blog

खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता

October 12, 2026
Next Post
माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

विठ्ठलाकडे जाणारा प्रवास की स्वतःला सापडण्याचा? - अमित जोशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026