• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूरात रंगणार रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ प्रांतपाल रो. जयेश आर. पटेल यांचा पदग्रहण सोहळा

Yes News Marathi by Yes News Marathi
July 16, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापूरात रंगणार रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ प्रांतपाल रो. जयेश आर. पटेल यांचा पदग्रहण सोहळा
0
SHARES
8
VIEWS

सोलापूर : रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३२च्या २०२६–२७ या वर्षासाठी नवनिर्वाचित प्रांतपाल रो. जयेश आर. पटेल यांचा पदग्रहण सोहळा रविवार, दि. १९ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता पद्मावती कन्व्हेन्शन हॉल, एमआयडीसी, अक्कलकोट रोड, सोलापूर येथे संपन्न होणार आहे.

या सोहळ्यास आचार्य परमपूज्य गोस्वामी १०८ श्री आश्रयकुमारजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून रोटरी इंटरनॅशनल डायरेक्टर रो. के. पी. नागेश हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मावळते प्रांतपाल रो. सुधीर लातूरे हे नवनिर्वाचित प्रांतपाल रो. जयेश आर. पटेल यांच्याकडे प्रांतपालपदाची सूत्रे औपचारिकरित्या सुपूर्द करतील.

रोटरी क्लब ऑफ सोलापूर या प्रतिष्ठित क्लबला ९० वर्षांची गौरवशाली परंपरा लाभली असून या क्लबमधून आठव्यांदा प्रांतपाल होण्याचा मान मिळत आहे. हा क्षण क्लबबरोबरच संपूर्ण रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ साठी अभिमानास्पद आणि ऐतिहासिक ठरणार आहे.

डिस्ट्रिक्ट ३१३२ अंतर्गत महाराष्ट्रातील ११ महसुली जिल्ह्यांमध्ये १०४ रोटरी क्लब, ४,२०० हून अधिक रोटेरियन्स आणि ३६ रोटरॅक्ट क्लब कार्यरत आहेत. यंदाच्या वर्षात “FLY 3132 – Together We Fly”, “Create Lasting Impact” आणि “लौकिक ते अलौकिक” या संकल्पनांवर आधारित कार्याला प्राधान्य दिले जाणार असून समाजात दृश्यमान, मोजता येणारा आणि चिरस्थायी सकारात्मक परिणाम घडवून आणण्यावर विशेष भर राहणार आहे.

प्रथम महिला रो. पारुल पटेल यांच्या नेतृत्वाखाली “रोटरी आदिशक्ती” हा महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा अभिनव उपक्रम प्रथमच डिस्ट्रिक्टमध्ये राबविण्यात येणार आहे. “माझे मन, माझी सुरक्षा, मी आदिशक्ती आणि माझे आरोग्य” या चार प्रमुख विषयांवर वर्षभर विविध जनजागृती व सक्षमीकरण उपक्रम आयोजित केले जातील.

यावर्षी “प्रत्येक क्लब – एक शाळा” या उपक्रमांतर्गत २०० हून अधिक डिजिटल क्लासरूम उभारण्यात येणार असून प्रत्येक शाळेत दोन कंपोस्ट बॅरल, सेंद्रिय पोषण बाग आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबविले जाणार आहेत. याशिवाय ओजस अभियान, नेत्र तपासणी, दंत आरोग्य, ॲनिमिया व थॅलेसेमिया जनजागृती, कर्करोग जनजागृती, जलसंवर्धन, वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धन यांसारखे व्यापक सेवा प्रकल्प राबविले जातील.

ग्रामीण भागात रोटरी कम्युनिटी कॉर्प्स ची स्थापना, रोटरी कृषी अवजारे बँक सुरू करणे तसेच युवकांसाठी आठ कौशल्य विकास केंद्रे उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

द रोटरी फाऊंडेशन अंतर्गत ग्लोबल ग्रँट्स, एंडोमेंट, मेजर गिफ्ट्स आणि ॲन्युअल गिव्हिंग वाढविण्यावर विशेष भर देण्यात येणार असून दर्जेदार सदस्यवाढ, महिला व युवा सदस्यांचा सहभाग वाढविणे हेही प्रमुख उद्दिष्ट राहणार आहे.

डिस्ट्रिक्ट ३१३२चे अधिकृत मोबाईल ॲप “आर-सेतू” हे प्रत्येक क्लबसाठी डिजिटल दुवा म्हणून कार्य करणार आहे. या माध्यमातून सेवा प्रकल्पांचे रिअल-टाईम रिपोर्टिंग, प्रशिक्षण, संवाद आणि माहिती व्यवस्थापन अधिक प्रभावी आणि गतिमान होणार आहे.

प्रांतपाल रो. जयेश आर. पटेल यांनी उद्योग समूह, सीएसआर कंपन्या आणि विविध संस्थांना आवाहन करताना सांगितले की, “शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, ग्रामीण विकास आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रांमध्ये समाजाला दीर्घकालीन लाभ देणारे प्रकल्प राबविण्यासाठी सीएसआर संस्थांनी रोटरीच्या माध्यमातून पुढाकार घ्यावा. डिस्ट्रिक्ट ३१३२ अशा प्रत्येक भागीदारीचे मनःपूर्वक स्वागत करेल.”

यावेळी ते म्हणाले, “रोटरी ही केवळ सेवा संस्था नसून समाज परिवर्तनाची जागतिक चळवळ आहे. प्रत्येक क्लब, प्रत्येक रोटेरियन आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या सक्रिय सहभागातून आपण समाजात दृश्यमान, मोजता येणारा आणि चिरस्थायी सकारात्मक बदल घडवून आणू. ‘लौकिक ते अलौकिक’ हा आपल्या सर्वांच्या सेवाप्रवासाचा संकल्प असून त्यातूनच ‘Create Lasting Impact’ हे ध्येय आपण साकार करू.”

Previous Post

विठ्ठलाकडे जाणारा प्रवास की स्वतःला सापडण्याचा? – अमित जोशी

Next Post

ज्येष्ठ रंगकर्मी विद्या काळे यांना अस्तित्व रंग साधक पुरस्कार जाहीर

Related Posts

डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!
इतर घडामोडी

डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!

August 31, 2026
कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!
इतर घडामोडी

कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!

August 31, 2026
लायन्स इंटरनॅशनलची नेपाळ-चीन सीमेवरील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत
इतर घडामोडी

लायन्स इंटरनॅशनलची नेपाळ-चीन सीमेवरील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत

August 31, 2026
विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे
इतर घडामोडी

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

August 29, 2026
‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…
इतर घडामोडी

‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…

August 29, 2026
कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना
इतर घडामोडी

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

August 28, 2026
Next Post
ज्येष्ठ रंगकर्मी विद्या काळे यांना अस्तित्व रंग साधक पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ रंगकर्मी विद्या काळे यांना अस्तित्व रंग साधक पुरस्कार जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!

डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!

August 31, 2026
सोलापूरकरांना आशादायक चित्र…या उड्डाणपुलाच्या कामाची गती वाढली..!

सोलापूरकरांना आशादायक चित्र…या उड्डाणपुलाच्या कामाची गती वाढली..!

August 31, 2026
कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!

कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!

August 31, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026