• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर जिल्हा परिषद सेवाकर्मी कार्यक्रमात राज्यात आदर्श ठरली

Yes News Marathi by Yes News Marathi
March 28, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापूर जिल्हा परिषद सेवाकर्मी कार्यक्रमात राज्यात आदर्श ठरली
0
SHARES
2
VIEWS

मुख्यमंत्री यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्यालय प्रमुख म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा सन्मान

सोलापूर जिल्हा परिषदेने १०० पैकी ८० गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला

सोलापूर जिल्हा परिषदेचा राज्यस्तरीय गौरव

सोलापूर, दिनांक २८:- महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवस सेवाकर्मी कार्यक्रमाच्या गुणांकनात सोलापूर जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांना आज रोजी मंत्रीमंडळ सभागृह, सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई येथे “उत्कृष्ट कार्यालय प्रमुख” म्हणून प्रशस्तिपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

जिल्हा परिषदेने सेवाकर्मी कार्यक्रमातील विविध निकषांवर १०० पैकी ८० गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. ज्येष्ठता सूची, पदोन्नती व सरळसेवा नियुक्तीची स्थिती, बिंदुनामावली प्रमाणीकरण, अनुकंपा नियुक्ती, iGOT पोर्टलवरील प्रशिक्षण पूर्णता आणि सेवापुस्तक अद्ययावत करणे या सर्व बाबींमध्ये सोलापूर जिल्हा परिषदेने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेचा सेवाकर्मी कार्यक्रमातील आदर्श ठसा

ग्रामविकास विभागाच्या अधिनस्त स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचे कार्यमूल्यांकन करण्यासाठी सेवाकर्मी कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात सोलापूर जिल्हा परिषदेने राज्यातील इतर सर्व जिल्हा परिषदांना मागे टाकत प्रथम क्रमांक मिळवला.

गुणांकन अहवालानुसार:

  • ज्येष्ठता सूची : ५७ पैकी सर्व संवर्गांची अद्ययावत ज्येष्ठता सूची प्रसिद्ध (१०/१० गुण).
  • पदोन्नती नियुक्ती : मंजूर ९५९ पदांपैकी ८२० कार्यरत, रिक्त पदांचे प्रमाण १४.४९% असूनही कार्यवाही उत्कृष्ट (१०/१० गुण).
  • सरळसेवा नियुक्ती : मंजूर १३,००७ पदांपैकी ११,४२५ कार्यरत, रिक्त पदांचे प्रमाण १२.१६% (१०/१० गुण).
  • बिंदुनामावली प्रमाणीकरण : ५७ पैकी ५५ संवर्गांची बिंदुनामावली प्रमाणित (९४.७४%) (१०/१० गुण).
  • अनुकंपा नियुक्ती : उपलब्ध १६८ पदांवर सर्व नियुक्त्या पूर्ण (१०/१० गुण).
  • iGOT पोर्टल प्रशिक्षण : १२,१२७ कर्मचाऱ्यांपैकी सर्वांचे रजिस्ट्रेशन पूर्ण, त्यापैकी ९५.१०% कर्मचाऱ्यांनी ५ कोर्स पूर्ण केले (१०/१० गुण).
  • सेवापुस्तक अद्ययावत : १२,१२७ पैकी १२,०३९ सेवापुस्तके अद्ययावत (९९.२७%) (२०/२० गुण).

या सर्वांमुळे सोलापूर जिल्हा परिषदेने १०० पैकी ८० गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळवला. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या नेतृत्वाखालील ही कामगिरी केवळ सोलापूर जिल्हा परिषदेपुरती मर्यादित नसून राज्यातील इतर जिल्हा परिषदांसाठीही आदर्श ठरली आहे.

“महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवस सेवाकर्मी कार्यक्रमातील पारदर्शकता, शिस्तबद्धता आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावर दिलेला भर यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेने प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा ठसा उमटला व राज्यात पहिला क्रमांक मिळवला. जिल्हा परिषदेने केलेली ही कामगिरी सर्व विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या सांघिक कामाचे यश आहे. हा पुरस्कार मिळाला याचा आनंद आहे, परंतु आपली जबाबदारी अधिक वाढलेली असून पुढे असेच काम करत राहू याची खात्री ही आहे.” – कुलदीप जंगम मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर.

Previous Post

TOP 25 । पालकमंत्री गोरे यांनी सगळ्यांचीच हवा केली टाईट..! जिल्ह्यावर मोठा होल्ड..

Next Post

अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा..

Related Posts

अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण
इतर घडामोडी

अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

August 12, 2026
अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा
इतर घडामोडी

अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

August 12, 2026
अक्कलकोट येथे शाळेचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी..!
इतर घडामोडी

अक्कलकोट येथे शाळेचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी..!

August 12, 2026
गायन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दयानंद ढेकळे यांना ‘राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार २०२६’
इतर घडामोडी

गायन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दयानंद ढेकळे यांना ‘राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार २०२६’

August 12, 2026
सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
इतर घडामोडी

सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

August 11, 2026
लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक
इतर घडामोडी

लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक

August 11, 2026
Next Post
अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा..

अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा..

ताज्या बातम्या

तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न

तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न

August 12, 2026
भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

August 12, 2026
अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

August 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026