• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर : ऊस वाहतुकीचा ट्रेलर माळीनगर पोलिस चौकीत घुसला!

Yes News Marathi by Yes News Marathi
November 21, 2021
in इतर घडामोडी
0
सोलापूर : ऊस वाहतुकीचा ट्रेलर माळीनगर पोलिस चौकीत घुसला!
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : ट्रॅक्‍टरची पिन निसटल्याने त्यास जोडलेले दोन्ही ट्रेलर शनिवारी माळीनगर पोलिस चौकीत घुसले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेत रस्त्याच्या कडेला बसून भाजीपाला विक्री करणारी महिला थोडक्‍यात बचावली. सोमवारच्या आठवडा बाजारादिवशी हा प्रसंग घडला असता तर मोठा अनर्थ झाला असता, अशी चर्चा आता माळीनगरात सुरू आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पोलिस प्रशासन व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे निर्बंध व नियंत्रण नसल्यानेच असे प्रकार घडत असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.

माळीनगरहून टेंभुर्णीच्या दिशेने हा ट्रॅक्‍टर निघाला होता. त्यास जोडलेले दोन्ही ट्रेलर ऊसविरहित होते. ट्रॅक्‍टरला जोडलेली ट्रेलरची पिन निसटल्यावर ट्रॅक्‍टर तसाच पुढे गेला. ट्रॅक्‍टर चालकाला त्याचा पत्ताच नव्हता. पिनला असलेली लहानशी क्वाटर पिन चालकाने बसवली नव्हती. त्यामुळे हा प्रकार घडला. दरम्यान, ट्रॅक्‍टरला जोडलेले दोन्ही ट्रेलर वेगात काही अंतर ट्रॅक्‍टरच्या मागे धावत जाऊन अखेर पोलिस चौकीत शिरले. या घटनेतील ट्रॅक्‍टर व दोन्ही ट्रेलरला क्रमांक नव्हते हे विशेष. माढा तालुक्‍यातील विठ्ठलराव शिंदे कारखान्यास हा ट्रॅक्‍टर ऊस वाहतूक करत आहे.

या घटनेत भाजीपाला विक्रेती महिला जखमी झाली असून, ती बालंबाल बचावली. तिचा भाजीपाला इतस्ततः विखुरलेल्या स्थितीत दिसत होता. विजेच्या वायर, टेलिफोन वायर, टीव्हीच्या केबल यामध्ये तुटल्या. पोलिस चौकीचे कंपाउंड, बोर्ड याचे नुकसान झाले आहे. या पोलिस चौकीच्या समोरच रस्त्याच्या कडेला विजेचा ट्रान्सफॉर्मर आहे. हे ट्रेलर ट्रान्सफॉर्मरला धडकले असते तर मोठी दुर्घटना घडली असती. माळीनगरचा आठवडा बाजार सोमवारी पोलिस चौकीच्या परिसरातच भरतो. त्या दिवशी ही घटना घडली असती तर मोठी जीवितहानी झाली असती. त्यामुळे यापुढे येथे आठवडा बाजार भरू देणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले. उसाच्या अति वजनाने ट्रेलरचे टायर रस्त्यावरून जाताना फुटत असल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेकदा उसाने भरलेले ट्रेलर रस्त्यावरच आडवे झाल्याचे पाहावयास मिळत आहे.

Previous Post

सोलापूर रेल्वे चाईल्ड हेल्प डेस्कच्या बाल दिन सप्ताहचा शेवट

Next Post

प्रभाग क्रमांक २३ कीतुरचनम्मा नगर येथे रस्तेविकास कामाचे शुभारंभ

Related Posts

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
इतर घडामोडी

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ
इतर घडामोडी

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026
मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ
इतर घडामोडी

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

August 19, 2026
SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार
इतर घडामोडी

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

August 19, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार
इतर घडामोडी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

August 19, 2026
पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!
इतर घडामोडी

पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!

August 19, 2026
Next Post
प्रभाग क्रमांक २३ कीतुरचनम्मा नगर येथे रस्तेविकास कामाचे शुभारंभ

प्रभाग क्रमांक २३ कीतुरचनम्मा नगर येथे रस्तेविकास कामाचे शुभारंभ

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

सोलापूर जिल्ह्याला MahaSTRIDE टीम अंतर्गत 16 कोटींचे प्रोत्साहन अनुदान मंजूर

August 19, 2026
मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026