सोलापूर : सोलापूर शहरातील विमान सेवेला अडथळा ठरणारी आणि महापालिकेपासून न्यायालयापर्यंत सर्वांनी बेकादेशीर ठरवलेली सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडकामसाठी चार कंपन्यांनी टेंडर भरले आहे. तिसर्यांदा दिलेल्या मुदतवाढीचा वेळ काल सायंकाळी संपला असून कालपर्यंत चौघांनी टेंडर भरले आहे. आणि उद्या म्हणजेच शुक्रवारी निविदा उघडली जाणार असल्याची माहिती महापालिकेचे अधिकारी लक्ष्मण चलवादी यांनी येस न्युज मराठीला दिली.