सोलापूर : महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक असोसिएशन अंतर्गत जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा 2022 एस.आर.पी. कॅम्प सोरेगाव येथे दि.23 जुलै 2022 रोजी संपन्न झाली…
या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत 16 वर्षे मुले 100 मीटर धावणे या खेळ प्रकारात अरुल माने – द्वितीय क्रमांक पटकाविला. त्याची राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे…
या यशाबद्दल सेंट जोसेफ हायस्कूलचे प्राचार्य रेव्ह.गाॅडवीन सलधाना यांनी अरुलचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व त्याला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या…
अरुलला क्रीडाशिक्षक सनी भोसले व प्रशिक्षक सूर्याजी लिंगडे यांचे मार्गदर्शन लाभले…
16 वर्षे वयोगटाचे 27 व 28 ऑगस्ट रोजी अमरावती येथे राज्यस्तरीय मैदानी स्पर्धा होणार आहेत.