सोलापूर : समाजामध्ये आपण राहतो. त्या समाजाचे ऋण फेडणे हे आपले कर्तव्य आहे. प्रत्येकांनी स्वत:चा विकास साधता साधता राष्ट्राची सेवा करावी. श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद आहे. गरीब , होतकरू विद्यार्थी दत्तक योजनेची आज आवश्यकता असून श्रीमंतयोगी प्रतिष्ठानच्या या स्तुत्य विद्यार्थी दत्तक योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होऊन त्यातून उच्चपदस्थ अधिकारी घडतील असे प्रतिपादन इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉ.संजय मंठाळे यांनी केले.
श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून विद्यार्थी दत्तक योजना राबविण्यात येत आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी प्रतिष्ठानने रविवारी समाजकल्याण केंद्रा आपल्या विद्यार्थी दत्तक योजने अंतर्गत मान्यवरांच्या हस्ते इयत्ता 9 वी व दहावीच्या 31 गरिब व होतकरू विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तक, बँग व कम्पासपेटी आदी शैक्षणिक साहित्य देऊन सामाजिक बांधिलकीची परंपरा कायम राखली. त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉ.संजय मंठाळे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विचारमंचावर मध्य रेल्वेचे विभागाचे मुख्य निरीक्षक जाकीर अत्तार, साई समर्थ फायनान्सचे चेअरमन अनिल भुराडे व संस्थेचे संस्थापक महेश कासट आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ.संजय मंठाळे पुढे म्हणाले, समाजातल्या दानशूर व्यक्तीच्या साहयाने या स्तुत्य उपक्रमाला आर्थिक मदत मिळू शकली. यापुढेही प्रत्येक दानशूर व्यक्तीने श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या या विद्यार्थी दत्तक योजनेस सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
सुत्रसंचालन राहुल बिराजदार यांनी केले तर आभार प्रसाद माने यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अक्षता कासट, शुभांगी लचके, राजकुमार कांबळे, शंकर बंडगर, मल्लिकार्जुन यणपे, शुभम हंचाटे, श्रीकांत प्रधान, विश्वनाथ वाघमारे, मयुर गवते, गणेश येळमेली, निशांत वाघमारे, ओंकार भावसार, सुरेश लकडे आदीसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
अडचणीमुळे शिक्षण थांबू नये म्हणून विद्यार्थी दत्तक योजना : कासट
लाँकडाऊन व निर्बंध काळात विद्यार्थी खुप आर्थिक संकटात सापडला आहे. ऑनलाईन पध्दतीने मोबाईल वरून अभ्यास करत होते. अडचणीमुळे त्यांचे शिक्षण थांबू नये. या उद्देशाने याही वर्षी प्रतिष्ठानने 31 विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तक, बॅग व कम्पासपेटी आदी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले आहे. विद्यार्थी दत्तक योजनेचे हे चौथे वर्ष आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक महेश कासट यांनी दिली.