किल्ले जरंडेश्वरवरील श्री मारुती मंदिर भाविकांनी फुल्ल; अधिक मासातील शनिवार मुळे भाविकांच्या रांगा

0
41

सातारा (सुधीर गोखले) – अधिक मासातील आज शनिवारी असल्याने सातारा शहराजवळील निर्गरम्य आशा किल्ले जरंडेश्वर येथील प्राचीन श्री मारुती मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आज सकाळपासून मंदिरासमोर भाविकांची मोठी रांग पाहायला मिळाली दोन दिवस सुट्ट्या असल्याने येथील हिरवागार परिसर अधून मधून पडणाऱ्या पावसाच्या सरी पक्षांची किलबिल अधून मधून होणारे मोरांचे दर्शन अनुभवण्यासाठी दूरवरून पर्यटक मोठ्या संख्येने या भागाला भेटी देत आहेत.

आज अधिक शनिवार मुळे सकाळपासून भाविकांनी मंदिरामध्ये दर्शनासाठी कगर्दी केली सातारा कोरेगाव रस्त्यावरून जांब आणि त्रिपुटी येथून जरंडेश्वर किल्ल्याला जाता येते अधिक मासातील श्रावणी शनिवार त्यात पहाटेची काकड आरती नंतर मिळणार खिचडीचा प्रसाद घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली. या किल्ल्यावर पुरातन श्री राम पंचायतन, श्री मारुती मंदिर, श्री श्री महादेव मंदिर दिपमाळा आणि एक ऐतिहासिक घंटा आहे हि मंदिरे नेहमी पर्यटकांचे आणि गिर्यारोहकांचे आकर्षण ठरल्या आहेत. सध्या या भागामध्ये पावसाने सर्वत्र डोंगररांगां मधून धबधबे प्रविहित झाल्याने पर्यटकांची पहिली पसंती सातारा जिल्ह्याकडे असते. निसर्गरम्य वातावरण दाट धुक्यात हरवलेली वाट निम्म्या वाटे पर्यंत पायऱ्या मग पुढे जंगल असे पादांक्रात करत पुढे गेल्यावर मारुतीराया आपल्याला दर्शन देतो.