सोलापूर विभागातुन धावणाऱ्या विशेष गाड्यांना मुदतवाढ…

0
35

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन गाडी क्र. 01435 /01436 सोलापूर – लोकमान्य तिलक – सोलापूर , गाड़ी क्र. 01438/01437 तिरुपति- सोलापूर- तिरुपति, गाड़ी क्र. 01439/01440 पुणे – अमरावती- पुणे साप्ताहिक विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. तपशील खालीलप्रमाणे आहेतः
• गाडी क्र. 01435 सोलापूर – लोकमान्य तिलक साप्ताहिक विशेष गाडी सोलापूरहुन दि. 25.07.2023 पर्यन्त धावणार होती, आता ती 26.09.2023 पर्यन्त धावणार आहे.
• गाडी क्र. 01436 लोकमान्य तिलक- सोलापूर साप्ताहिक विशेष गाडी लोकमान्य तिलकहून दि. 26.07.2023 पर्यन्त धावणार होती, आता ती 27.09.2023 पर्यन्त धावणार आहे.
• गाडी क्र. 01438 तिरुपति – सोलापूर साप्ताहिक विशेष गाडी तिरुपतिहून दि. 27.07.2023 पर्यन्त धावणार होती, आता ती 28.09.2023 पर्यन्त धावणार आहे.
• गाडी क्र. 01437 सोलापूर – तिरुपति साप्ताहिक विशेष गाडी सोलापूरहून दि. 28.07.2023 पर्यन्त धावणार होती, आता ती 29.09.2023 पर्यन्त धावणार आहे.
• गाडी क्र. 01439 पुणे – अमरावती साप्ताहिक विशेष गाडी पुणेहून दि. 30.07.2023 पर्यन्त धावणार होती, आता ती 29.09.2023 पर्यन्त धावणार आहे.
• गाडी क्र. 01440 अमरावती- पुणे साप्ताहिक विशेष गाडी अमरावतीहून दि. 31.07.2023 पर्यन्त धावणार होती, आता ती 30.09.2023 पर्यन्त धावणार आहे.
या विशेष ट्रेनच्या थांबे आणि संरचनेमध्ये कोणताही बदल झालेला नाही.


तपशीलवार वेळा आणि थांब्यांसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.
प्रवाशांना स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड योग्य वर्तन पाळण्याचा सल्ला देण्यात येत आहे.