येस न्युज नेटवर्क : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी सत्तासंघर्षात एक पाऊल पुढं टाकलं आहे. आपल्या गटाचं नाव आता त्यांनी ठेवलं असून ‘शिवसेना-बाळासाहेब ठाकरे’ असं शिंदे गटाचं नाव असेल. आज संध्याकाळी या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. तर शिंदे गटाला बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर करण्याचा अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी दिली आहे. बाळासाहेबांचं नाव वापरुन सहानुभूती दाखवायची गरज नाही. त्यांना हे नाव वापरण्याचा अधिकार नाही. आम्हाला पक्षप्रमुखांनी आदेश दिले नाहीत म्हणून आम्ही शांत आहोत, अशा भावना शिवसेना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत.