• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर जनता सहकारी बँकेकडून सात टक्के लाभांश; सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण

Yes News Marathi by Yes News Marathi
February 15, 2024
in इतर घडामोडी
0
सोलापूर जनता सहकारी बँकेकडून सात टक्के लाभांश; सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण
0
SHARES
1
VIEWS


सोलापूर : सोलापूर जनता सहकारी बँकेकडून आर्थिक वर्ष २०२२ – २३ साठी ७ टक्के लाभांश जाहीर केला आहे. सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनिल पेंडसे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
अध्यक्ष पेंडसे म्हणाले, कोविड आणि त्यानंतरच्या काळात बहुतांश सहकारी बँकांची आर्थिक स्थिती काही प्रमाणात नाजूक बनली होती. मात्र त्याही परिस्थितीत सोलापूर जनता सहकारी बँकेने यंदा २६.१० कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाकडून साहजिकच सहकारी बँकांवर आर्थिक समतोलासाठी काही निर्बंध लावण्यात आले होते. परिणामी बँकेला लाभांश वाटप करणे शक्य होत नव्हते. सोलापूर जनता सहकारी बँकेस आर्थिक वर्ष २०२२ – २३ मध्ये २६ कोटी १० लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. त्यामुळे बँकेच्या संचालक मंडळाने सभासदांना यंदा ७ टक्के प्रमाणे लाभांश देण्यासाठी रिझर्व बँकेकडे प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावास अनुमती मिळाली असून ७ टक्के लाभांश सभासदांना वाटप करण्यात येणार आहे, असे बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे म्हणाले.

सोलापूर जनता सहकारी बँकेकडे १८११ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. बँकेने ९७४ कोटी रुपयांची कर्जे वितरित केली असून एकूण व्यवसाय २७८५ कोटी रुपयांचा झाला आहे. बँकेचे भाग भांडवल ७०.८९ कोटी रुपये आहे. तर बँकेची निव्वळ संपत्ती १३७ कोटी रुपये आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार भांडवल पर्याप्तता (सीआरएआर) १२टक्के असणे अपेक्षित आहे. मात्र सोलापूर जनता सहकारी बँकेने यातदेखील आघाडी घेतली असून बँकेची भांडवल पर्याप्तता १६.९७ टक्के आहे. त्यामुळे बँकेच्या भांडवलाची स्थिती उत्तम असल्याचेही अध्यक्ष पेंडसे म्हणाले.

मागील आर्थिक वर्षात सोलापूर जनता सहकारी बँकेने ४३.५७ कोटी रुपयांचा ऑपरेटिंग नफा मिळवला आहे.तर बँकेच्या नेट एनपीएमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत मोठी घट होऊन नेट एनपीए ४.२८ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. वर्ष २०२३-२४ मध्ये चांगली वसुली व एनपीए व्यवस्थापनामुळे आजअखेर नेट एनपीएचे प्रमाण २.४३ पर्यंत खाली आले आहे.

सोलापूर जनता सहकारी बँकेने दिलेले कर्जाचे व्याजदर इतर बँकांच्या तुलनेत कमी आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होत आहे. नवीन वाहन खरेदी व गृहकर्जाचे व्याजदर कमी झाल्याने ग्राहकांना बँकेकडून दिलासा मिळाला आहे, असेही पेंडसे यांनी सांगितले.
आरबीआयने पतधोरणामध्ये पॉलिसी दरात बदल केल्याने त्याचा परिणाम ठेवी आणि कर्जे यांच्या व्याजदरात झाला आहे. अशा परिस्थितीतही बँकेने व्यवसाय वाढीसाठी विविध प्रकारच्या कर्ज योजना जाहीर केल्या आणि त्यातून समाजातील सर्व घटकांना फायदा व्हावा असा विचार केला. अमृत उत्सव कर्ज योजनेअंतर्गत कर्जावरील व्याजदर कमी करून खातेदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न बँकेने केला असल्याचेही अध्यक्ष पेंडसे यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेस सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे, उपाध्यक्ष अॅड. मिलिंद कुलकर्णी, संचालक प्राचार्य गजानन धरणे, अॅड. प्रदीपसिंह राजपूत, मुकुंद कुलकर्णी, वरदराज बंग, विनोद कुचेरिया, जगदीश भुतडा, चंद्रिका चौहान, रविंद्र साळे, आनंद कुलकर्णी, सी.ए. गिरीश बोरगावकर, राजेश पवार, पुरुषोत्तम उडता, दत्तात्रय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी मुकुंद कुलकर्णी, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य डॉ. अजितकुमार देशपांडे, पेंटप्पा गड्डम, सी. ए. राजेंद्र बुरा तसेच मुख्य कार्यालयातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

Tags: Solapur Janata Sahakari Bank
Previous Post

माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी आणि संभाजी भडकुंबे यांनी मुंबईमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

Next Post

स्नेहालय बालगृह कारंबा येथे चाचा नेहरू बाल महोत्सवाच्या आयोजन

Related Posts

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला
इतर घडामोडी

सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला

September 4, 2026
सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ
इतर घडामोडी

सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ

September 4, 2026
Next Post
स्नेहालय बालगृह कारंबा येथे चाचा नेहरू बाल महोत्सवाच्या आयोजन

स्नेहालय बालगृह कारंबा येथे चाचा नेहरू बाल महोत्सवाच्या आयोजन

ताज्या बातम्या

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026