श्रीराम कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची कृषी क्षेत्रातील कंपनीत निवड

0
30

सोलापूर: पानीव, ता. माळशिरस येथील श्रीराम शिक्षण संस्था संचलित श्रीराम कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या तीन विद्यार्थ्यांची कृषी क्षेत्रातील नामांकित अश्या विविध कंपनीमध्ये शैक्षणिक गुण व बौद्धिक क्षमतेच्या आधारावर अभियंता म्हणून निवड झाली. यामध्ये अनिकेत राजशेखर हुगार याची कोठारी अग्रिटेक मध्ये डिझाईन इंजिनिअर, अक्षय गुरुनाथ सुतार याची नेटाफिम इरिगेशन मध्ये डिझाईन इंजिनिअर व अक्षय बाळू चंदनशिवे याची IRIS पॉलिमर मध्ये सेल्स इंजिनिअर म्हणून निवड झाली.

तसेच या सर्व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, श्रीराम कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयातील शैक्षणिक संस्कृती, शिस्त व सर्व शिक्षक यांच्या अचूक मार्गदर्शनामुळे यश संपादन करता आले. या निवडीबद्दल श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील, मार्गदर्शिका श्रीलेखा पाटील, सचिव अभिषेक पाटील, सहसचिव करण पाटील, विशेष कार्यकारी अधिकारी प्रमोद झगडे, प्राचार्य डॉ. अमित झांबरे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा