• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्ह्यात तलाठी परीक्षेच्या अनुषंगाने परीक्षा केंद्राच्या परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू

Yes News Marathi by Yes News Marathi
August 25, 2023
in इतर घडामोडी
0
0
SHARES
1
VIEWS

परीक्षा केंद्र परिसरात दिनांक सकाळी 8 ते सायंकाळी 7 या कालावधीत कलम 144 चे आदेश लागू राहतील. परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात सकाळी 09.00 वा. ते दु. 1.00 वा. या कालावधीत ध्वनीक्षेपके बंद ठेवावेत.

सोलापूर, दि. 25(जिमाका):- सोलापूर जिल्हयाच्या हद्दीत (ग्रामीण भागामध्ये ) महसूल विभाागतील गट क संवर्गातील तलाठी सरळसेवा भरती परिक्षा दिनांक 26 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत नियोजित असल्याने सर्व परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात शांतता, कायदा व सुव्यस्था अबाधित रहावी यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्याचे आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकारी शमा पवार यांनी दिले आहेत.

यानुसार पुढील प्रतिबंधात्मक आदेश लागू होत आहेत. परीक्षाकेंद्राच्या परीसरात कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यात येणार नाही. परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करण्यात येणार नाही. परीक्षा केंद्राचे 100 मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर, पानपट्टी, टायपिंग सेंटर, फॅक्स, एस.टी.डी. बुथ, ध्वनीक्षेपक, संगणक केंद्र, इंटरनेट कॅफे इत्यादी दळणवळणाची माध्यमे बंद राहतील. तसेच परीक्षा केंद्राचे परिसरात मोबाईल फोन, पेजर सारखा दुरसंचार साधने व इतर इलेक्ट्रानिक गॅझेटस, स्मार्ट वॉच, फॅक्स, ई-मेल व इतर प्रसारमाध्यमे घेवून परीक्षार्थीना प्रवेश करणेस मनाई असेल. कोणत्याही व्यक्तीकडून परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतेही बाधा उत्पन्न करण्यात येणार नाही. परीक्षा केंद्रावर कोणत्याही वाहनास प्रवेशास मनाई राहील.

परीक्षेशी संबंधित नसलेल्या व्यक्तींना परीक्षा केंद्रात प्रवेश नसेल. केवळ संबंधित परीक्षा केंद्रावर नेमणुक केलेले मुख्याध्यापक/ कर्मचारी, शासकिय कामावरील अधिकारी व कर्मचारी संबंधित शाळेतील परीक्षार्थी यांनाच परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश राहील इतरांना प्रवेश असणार नाही. परीक्षा केंद्राचे 100 मीटरचे आवारात 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही.परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात सकाळी 09.00 वा. ते दु. 1.00 वा. या कालावधीत ध्वनीक्षेपके बंद ठेवावेत.

परीक्षाकेंद्राचे नाव-1. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी ता. पंढरपूर जिल्हा सोलापूर 4413304- आदेशाचा कालावधी दि.26 व 27 ऑगस्ट 2023 व दि.10 सप्टेंबर 2023 – सकाळी 08.00 वा. ते सायं.07.00 वाजेपर्यंत . पोलीस ठाणे पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे.

परीक्षाकेंद्राचे नाव- 2.सोलापूर डिजिटल हब गट नं 61/1, सोलापूर –बार्शी रोड, गुळवंची , सोलापूर 413255- आदेशाचा कालावधी दि.26, 27, 28, 29 व 31ऑगस्ट 2023 दि.01,04,05,06,08,10,13 व 14 सप्टेंबर 2023 सकाळी 08.00 ते सायं.07.00 वाजेपर्यंत – सोलापूर तालुका पोलीस ठाणे.

हा आदेश परिक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी/ कर्मचारी परीक्षा उपकेंद्रावर निगराणी करणारे अधिकारी व पोलीस अधिकारी/ कर्मचारी यांचे बाबत त्यांचे परीक्षेसबंधी कर्तव्य पार पाडण्याचे अनुषंगाने लागू राहणार नाही. शासनाने परवानगी दिलेल्या भ्रमणध्वनीचा वापर करता येईल. इतर सर्वांना भ्रमणध्वनी नेण्यास बंदी असेल.

या आदेशाचा अवमान केल्यास भारतीय दंड विधानाचे कलम 188 नुसार गुन्हा नोंदवून फौजदारी कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद केलेले आहे.

Tags: 1973 applicablepremises of the examination centerSection 144
Previous Post

राज्य अधिस्वीकृती समिती अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी यांची निवड

Next Post

भारतातील पश्चिम विभागात स्मार्ट सिटी योजनेसाठी सोलापूर महापालिकेला पारितोषक

Related Posts

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे
इतर घडामोडी

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

August 29, 2026
‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…
इतर घडामोडी

‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…

August 29, 2026
कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना
इतर घडामोडी

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

August 28, 2026
बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना
इतर घडामोडी

बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना

August 28, 2026
कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार
इतर घडामोडी

कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार

August 28, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
Next Post
भारतातील पश्चिम विभागात स्मार्ट सिटी योजनेसाठी सोलापूर महापालिकेला पारितोषक

भारतातील पश्चिम विभागात स्मार्ट सिटी योजनेसाठी सोलापूर महापालिकेला पारितोषक

ताज्या बातम्या

मक्याने साखरेला टाकले मागे! इथेनॉल निर्मितीत मका ठरली ‘किंग’

मक्याने साखरेला टाकले मागे! इथेनॉल निर्मितीत मका ठरली ‘किंग’

August 30, 2026
विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

August 29, 2026
‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…

‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…

August 29, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026