सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्रात मुंबई,छत्रपती संभाजीनगर,सोलापूरयेथे कार्यक्रमाचे आयोजन..
दिनांक २२ फेब्रु सोलापूर सांस्कृतिक कार्य विभागामार्फत माननीय व्यक्तीची जन्मशताब्दी चे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते यंदा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती वर्षा निमित्त दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजता हुतात्मा स्मृति मंदिर, सोलापूर येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
भारताचे पहिले उपपंतप्रधान व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे समन्वय भारत भारती ही संस्था करत आहे. या कार्यक्रमास लोकप्रतिनिधी तसेच विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या राष्ट्रनिर्माणातील अतुलनीय योगदानाची आठवण करून देणारा हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना ॲड आशिष शेलार मंत्री सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान यांची असून या कार्यक्रमास मार्गदर्शन डॉ किरण कुलकर्णी सचिव सांस्कृतिक व कार्य विभाग यांचे लाभले आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित रहावे असे आवाहन श्रीराम पांडे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी केले आहे











