• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जागतिक शौचालय दिनाच्‍या औचित्‍याने जिल्‍हयात स्‍वच्‍छता उपक्रम

Yes News Marathi by Yes News Marathi
November 18, 2023
in इतर घडामोडी
0
जागतिक शौचालय दिनाच्‍या औचित्‍याने जिल्‍हयात स्‍वच्‍छता उपक्रम
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर ,दि. १९ नोव्हेबर रोजी जागतिक शौचालय दिन आहे. जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत राज्यातील गावे हागणदारीमुक्त अधिक होण्यासाठी व वैयक्तिक शौचालयाचा वापराबाबत जिल्‍हयात स्‍वच्‍छता उपक्रम राबवावा असे आवाहन जिल्‍हा परिषदेच्‍या स्‍वच्‍छ भारत मिशन ग्रामीण कक्षाने केले आहे.

संपूर्ण ग्रामीण स्वच्छता शाश्‍वत स्वरूपात टिकविण्याच्या अनुषंगाने स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत ग्रामीण भागातील सार्वजनिक शौचालय संकुलाचे बांधकाम, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, गोबरधन, मैलागाळ व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन अशाप्रकारे कामे पूर्ण करून गावे हागणदारीमुक्त अधिक म्हणून घोषित केली जात आहेत. या औचित्‍याने रविवार दिनांक 19 नोव्‍हेंबर रोजी जिल्‍हयात सर्व गावातून स्‍वच्‍छता उपक्रम राबविण्‍यात येणार आहे.

ग्रामीण भागातील ज्या कुटुंबांकडे शौचालय नाही अशा कुटुंबांना शौचालय देण्यासाठी केंद्र शासनाने ऑनलाइनद्वारे वैयक्तिक शौचालय मागणीची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. याची माहिती ग्रामस्थांना देवून नावे ऑनलाईन करणे व शौचालय बांधकाम करणे, यापूर्वी ज्यांनी एक खड्डयाचे शौचालय बांधलेले आहे अशा कुटूंबांना दुसऱ्या खड्ड्यांचे बांधकाम करावयास लावणे. जेणेकरून हे शौचालय त्यांना नियमित वापरता येईल. सार्वजनिक शौचालय बांधकाम व सार्वजनिक शौचालयाची स्‍वच्‍छता तसेच सांडपाणी व घनकचरा व्‍यवस्‍थापनाची कामे करुन गाव शाश्‍वत स्‍वच्‍छ ठेवणे आदी उपक्रम गावपातळीवर राबवावेत.

सदर उपक्रमासंदर्भात गट विकास अधिकारी यांना सूचना देण्‍यात आल्‍या आहेत. जागतिक शौचालय दिनानिमित्‍त स्‍वच्‍छतेचे उपक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी नागरीकांनी मोठया प्रमाणात सहभाग घेवून गावे शाश्‍वत स्‍वच्‍छ करावीत असे आवाहन मुख्‍य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे , अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे व जिल्‍हा पाणी व स्‍वच्‍छता मिशनचे प्रकल्‍प संचालक तथा उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी केले आहे.
जिल्हा पाणी व स्वच्छचा कक्षातील लेखाधिकारी श्रींकांत मिरगाळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव , अधिक्षक सचिन सोनकांबळे, प्रशिक्षण समन्वयक शंकर बंडगर , संवाद सल्लागार सचिन सोनवणे, सांडपाणी सल्लागार प्रशांत दबडे, सनियंत्रण सल्लागार यशवंती धत्तुरे , जिल्हा पाणी गुणवत्ता सल्लागार दिपाली व्हटे, आर्थिक समन्वयक अर्चना कणकी , समन्वयक आनंद मोची, घनकचरा सल्लागार मुकूंद आकुडे , क्षमता बांधणी महादेव शिंदे, समन्वयक अल्फिया बिराजदार हे विशेष मोहिमे साठी प्रयत्न करत आहे.

Tags: districtoccasionSanitation activitiesWorld Toilet Day
Previous Post

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना: महिला सशक्तीकरणाचे एक पाऊल

Next Post

सोलापूर विद्यापीठ कुलसचिव योगिनी घारे यांना इंदिरा प्रियदर्शनी अवॉर्ड 2023 देऊन सन्मानित

Related Posts

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ
इतर घडामोडी

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

June 11, 2026
अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 11, 2026
असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन
इतर घडामोडी

असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन

June 11, 2026
उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले
इतर घडामोडी

उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले

June 10, 2026
मोदींना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो; सोलापुरात महाआरतीद्वारे प्रार्थना
इतर घडामोडी

मोदींना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो; सोलापुरात महाआरतीद्वारे प्रार्थना

June 10, 2026
सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 10, 2026
Next Post
सोलापूर विद्यापीठ कुलसचिव योगिनी घारे यांना इंदिरा प्रियदर्शनी अवॉर्ड 2023 देऊन सन्मानित

सोलापूर विद्यापीठ कुलसचिव योगिनी घारे यांना इंदिरा प्रियदर्शनी अवॉर्ड 2023 देऊन सन्मानित

ताज्या बातम्या

ॲट्रॉसिटी अंतर्गत खून प्रकरणातील वारस शोध मोहीम; 15 दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

ॲट्रॉसिटी अंतर्गत खून प्रकरणातील वारस शोध मोहीम; 15 दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

June 11, 2026
गोटपॉक्स लसीकरण: पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसमात्रांचे वाटप सुरू

गोटपॉक्स लसीकरण: पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसमात्रांचे वाटप सुरू

June 11, 2026
राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

June 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026