समीर वानखेडेंना अटकेपासून 22 मे पर्यंत संरक्षण, उच्च न्यायालयाचा आदेश

0
12

मुंबई: आर्यन खान प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या एनसीबी मुंबईचे माजी डायरेक्टर समीर वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला आहे. समीर वानखेडे यांना 22 मे पर्यंत अटक करु नयेत असे आदेश न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. तसेच वानखेडे यांच्या याचिकेवर सीबीआयने सोमवारपर्यंत उत्तर द्यावं असेही आदेश देण्यात आले आहेत.

समीर वानखेडेंना शनिवारी सीबीआय कार्यालयात जाऊन जबाब नोंदवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच वानखेडेंच्या याचिकेवर सीबीआयला सोमवारपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. समीर वानखेडेंनी तपासात सहकार्य करावं, तूर्तास त्यांना अटक करणार नाही अशी ग्वाही सीबीआयने हायकोर्टाला दिली आहे. दरम्यान, सीबीआयच्या आरोपांवर समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. त्यामध्ये समीर वानखेडे यांनी मोठा खुलासा केला होता. समीर वानखेडे यांनी शाहरूख खानसोबत झालेल्या संभाषणाची प्रत याचिकेत जोडली असून माझ्या मुलाची काळजी घे अशी विनंती शाहरुख खानने केली होती.