रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा मूकबधिर विद्यालयात प्रयत्न, शिस्त, आणि देशभक्तीचा त्रिवेणी संगम अनुभवण्यास मिळाला असे विचार हृदय रोग तज्ज्ञ डॉ अनुपम शाह यांनी व्यक्त केले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी नॉर्थ च्या अध्यक्षा डॉ जानवी माखीजा या होत्या.
मूकबधिर विद्यार्थ्यांची शिकण्याची जिद्द, प्रयत्न, त्यांना शिक्षकांचे होणारे मार्गदर्शन, सारेच प्रेरणादायी आहे. त्यांच्या नृत्याविष्कारातून देशभक्तीची प्रचिती अनुभवण्यास मिळाली असे ही ते म्हणाले. रोटरी नॉर्थ दिव्यांगासाठी अर्धशतकाहून अधिक काळ प्रेरक कार्य करत असल्याबद्दल त्यांचे आणि दमाणी परिवाराचे त्यांनी विशेष आभार मानले.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि प्रास्ताविक मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे यांनी केले. रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ च्या अध्यक्षा डॉ जानवी माखीजा यांनी डॉ अनुपम शाह यांचा पुष्पगुच्छ देऊन तर शाळेचे सचिव सुनील दावडा यांनी स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.
या प्रसंगी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ श्री विक्रांत ओक यांनी विद्यार्थ्यांसाठी क्रीडा साहित्य, कपाट आणि खाऊ वाटप केले. तसेच आयडॉल्स संस्थेचे अध्यक्ष कुणाल बाबरे यांनीसुद्धा विद्यार्थ्यांना या प्रसंगी खाऊ वाटप केला .
या कार्यक्रमास शाळेचे सचिव सुनील दावडा, खजिनदार राजगोपाल झंवर, डॉक्टर वैद्य, हिरालाल डागा, दौलत सीताफळे, दीपक आहुजा, बळीराम पावडे, पवन अग्रवाल, डॉक्टर सुदीप सारडा , डॉक्टर किरण सारडा, आसावरी सराफ, डॉ शितोळे, विक्रांत ओक, विनंद ओक, मुकेश मेहता, गंगाधर मदभावी, रेणुका पसपुलें, संध्या चंदनशिवे, विजया पिटाळकर, गजानन गडगे, नागनाथ बसाटे, सोमनाथ ठाकर, दिनेश ताटे, आनंद पारेकर, विठ्ठल सातपुते, सैपन बागवान ,चिदानंद बेनुरे, साहेबगौडा पाटील,सोमनाथ थोरात बाबासाहेब पवार आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित पाटील यांनी केले. तर आभार सचिव सुनील दावडा यांनी मानले.