जीव ओतून काम करणारा क्लब – डी जी ई शीतल शहा

0
32

सोलापूर – रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ हा क्लब सामाजिक कार्यात ‘हाती घ्यावे ते तडीस न्यावे’ या उक्ती प्रमाणे जीव ओतून काम करतो. स्थापनेच्या पन्नास वर्षातील सामाजिक कार्याची सतत चढती कमानच आहे असे गौरवोद्गार डी जी ई रोटरियन शीतल शाह यांनी काढले. रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा मूकबधिर विद्यालयास दिलेल्या सदिच्छा भेटीत ते बोलत होते. या शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्साह, शाळेचे कामकाज, कर्मचाऱ्यांचे योगदान बघून ते भारावून गेले .

प्रारंभी रोटरी नॉर्थ चे नूतन अध्यक्ष ऍड मल्लिकार्जुन अष्टगी यांनी प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तर असिस्टंट गव्हर्नर जयेश पटेल यांचा सत्कार शाळेचे सचिव सुनील दावडा यांनी केला. शीतल शहा यांच्या सुविद्य पत्नी रागिणी शाह यांचा सत्कार मुख्याध्यापिका गाताडे यांनी केला. नूतन अध्यक्ष ऍड मल्लिकार्जुन अष्टगी याना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. नूतन सचिवा जान्हवी माखीजा यांचा सत्कार रागिणी शहा यांनी केला. स्वागत आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे यांनी केले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन शाळेचे सचिव सुनील दावडा यांनी केले. तर सूत्रसंचालन अजित पाटील यांनी केले. या समारंभास सचिव सुनील दावडा, खजिनदार राजगोपालजी झंवर, डॉ सिद्धेश्वर वाले, जान्हवी माखीजा, रेणुका पसपुलें, संध्या चंदनशिवे, विजया पिटाळकर, गजानन गडगे, नागनाथ बसाटे, सोमनाथ ठाकर, दिनेश ताटे, आनंद पारेकर, विठ्ठल सातपुते, सैपन बागवान, चिदानंद बेनुरे, गंगाधर मदभावी , अजित पाटील, साहेबगौडा पाटील, सोमनाथ थोरात, बाबासाहेब पवार आदी उपस्थित होते.