सोलापूर : प्रभाग क्रमांक २२ मधील संजय गांधी नगर परिसरात गुरुकृपा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन उत्साहात करण्यात आले. मंदिरात पारंपरिक पद्धतीने पाळणा कार्यक्रम पार पडला असून भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला.


या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमांसह रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरासाठी शिवशंभो रक्तपेढी, सोलापूर यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमादरम्यान भाविकांसाठी महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली होती. या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश जाधव, नागेश कलाल, कृष्णा काळे, छायप्पा चव्हाण, बालाजी जाधव, किसन खरात, रितेश शिखरे, ऋषी जाधव, सौरभ जाधव, निलेश भंडारे आदी उपस्थित होते. तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.











