सोलापूर : ज्यांनी तीर्थक्षेत्र श्री अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मंदिरासाठी प्रचंड संघर्ष केला आणि मंदिर बांधणीही केली, अशा भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आम्ही उभे राहणार असल्याची भावना सर्वसामान्य सोलापूरकरांनी बुधवारी व्यक्त केल्या. निमित्त होते श्रीराम नवमीचे.
‘जो राम को लाये है उनको हम लायेंगे’ या गीताने शहरात सर्वत्र भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचे जल्लोषात स्वागत झाले. आमदार राम सातपुते यांनी साखरपेठ येथील हिंदूसाम्राज्य मंडळ, मंगळवार पेठ येथील वंदे मातरम मित्र मंडळ आदी मंडळांना भेटी देऊन त्या ठिकाणी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचे मनोभावे पूजन केले. यावेळी माजी महापौर शोभा बनशेट्टी, माजी नगरसेवक जगदीश पाटील, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य उदयशंकर पाटील, सतीश महाले आदी उपस्थित होते.
अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेनंतरची यंदाची पहिलीच रामनवमी असल्यामुळे सोलापूरकरांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. रांगोळी काढून, भगवे झेंडे लावून, फटाक्यांची आतिषबाजी करत मिठाई वाटून सोलापूरकरांनी श्रीराम नवमी साजरी केली. सोलापूरकरांच्या या आनंदात सहभागी होत भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनीही प्रभू श्रीरामांना वंदन केले.
यावेळी नागरिकांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. गेल्या ५०० वर्षांपासून अवघा हिंदू समाज ज्या प्रभू श्रीरामांच्या मंदिराची आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अवघ्या जगाने पाहिला. त्याचे आम्हाला प्रचंड समाधान आहे. त्यामुळे यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिनिधी असलेल्या आमदार राम सातपुते यांनाच सर्व सोलापूरकर समर्थन देणार असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले.
आमदार राम सातपुते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमुळे श्री अयोध्येमध्ये आज प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर दिसत आहे. आजचा दिवस सर्वांसाठी ऐतिहासिक आहे. अयोध्या येथे श्रीराम मंदिराची उभारणी झाल्यामुळे यंदा सर्वत्र श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरी होताना दिसत आहे अवघे सोलापूर भगवेमय झाल्याचे समाधान असल्याचे भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी सांगितले.
यावेळी मोहन गुर्रम, सनी कन्ना, नागेश चेतल, रोहित दुधगुंडी, रोहन चिलवेरी, विनीत कन्ना, नागराज वड्डेपल्ली, तुळशीदास भुतडा, सोनाली मुटकिरी, आनंद गोसकी आदी उपस्थित होते.