• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा गुरुवारी 21 वा दीक्षांत समारंभ…

Yes News Marathi by Yes News Marathi
September 15, 2025
in इतर घडामोडी
0
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा गुरुवारी 21 वा दीक्षांत समारंभ…
0
SHARES
0
VIEWS

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील येणार…

10 हजार 955 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान होणार…

89 संशोधकांना पीएच. डी पदवी तर 59 सुवर्णपदकाचेही वितरण होणार…

सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 21 वा दीक्षांत समारंभ गुरुवार, दि. 18 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी अकरा वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत मैदानात होणार असून यावेळी एकूण 10 हजार 955 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. याचबरोबर 89 संशोधक विद्यार्थ्यांना पीएच. डी पदवी तर 59 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या दीक्षांत समारंभास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री मंत्री चंद्रकांत पाटील, गोवा उच्च शिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. गोपाल मुगेरया हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी या मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान होणार आहे. गुरुवारी, सकाळी साडेदहा वाजता प्रशासकीय इमारतीपासून ते दीक्षांत मंडपापर्यंत दीक्षांत मिरवणूक निघणार आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे हे ज्ञानदंड हाती घेऊन मिरवणुकीच्या अग्रभागी असणार आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात होईल. या समारंभात वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, मानवविज्ञान विद्याशाखा, आंतर विद्याशाखा, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना पदवी देऊन सन्मानित करण्यात येईल. 

यावर्षी 89 विद्यार्थ्यांना पीएच.डी पदवी प्रदान केली जाणार आहे. त्याचबरोबर यंदा 59 विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत. विविध विषयात गुणानुक्रमे प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना देणगीदारांनी दिलेल्या रकमेतून सुवर्णपदक देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. अशा एकूण 59 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देऊन सन्मानित केले जाणार आहे. यामध्ये 15 मुले तर 44 मुलींचा समावेश आहे.

दीक्षांत समारंभाचा कार्यक्रम झाल्यानंतर महाविद्यालयांना पदवी प्रमाणपत्र वाटप केले जाणार आहे. यासाठी विद्यापीठ परीक्षा विभागाने खास सोय केलेली आहे. दीक्षांत समारंभासाठी पदवी ग्रहण करणारे स्नातक, अधिष्ठाता, मान्यवरांना बाराबंदीचा पोशाख राहणार आहे. गळ्यात उपरणे देखील राहणार आहे. सुवर्णपदके पटकावणाऱ्यांमध्ये मुलींची संख्या अधिक आहे.

या पत्रकार परिषदेस प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, वित्त व लेखाधिकारी सीए महादेव खराडे आदी उपस्थित होते.

Previous Post

सोलापुरातील ‘शिल्पकारां’वर रोचक संवाद

Next Post

सोलापूर- मुंबई विमानसेवेला दिवाळीचा ‘मुहूर्त’..!

Related Posts

कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज
इतर घडामोडी

कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

June 20, 2026
गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे
इतर घडामोडी

गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे

June 20, 2026
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन
इतर घडामोडी

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन

June 20, 2026
सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक
इतर घडामोडी

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

June 19, 2026
आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच
इतर घडामोडी

आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

June 19, 2026
जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार
इतर घडामोडी

जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार

June 19, 2026
Next Post
सोलापूर- मुंबई विमानसेवेला दिवाळीचा ‘मुहूर्त’..!

सोलापूर- मुंबई विमानसेवेला दिवाळीचा 'मुहूर्त'..!

ताज्या बातम्या

निमा सोलापूर तर्फे जागतिक योग दिन उत्साहात साजरा

निमा सोलापूर तर्फे जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन

June 21, 2026
एनसीसी कॅडेट्सचा योग दिन उत्साहात साजरा

एनसीसी कॅडेट्सचा योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026