• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पुण्यातील सॉफ्टवेअर व्यावसायिकाकडेे 5 कोटी खंडणीची मागणी

Yes News Marathi by Yes News Marathi
May 18, 2023
in मुख्य बातमी
0
पुण्यातील सॉफ्टवेअर व्यावसायिकाकडेे 5 कोटी खंडणीची मागणी
0
SHARES
0
VIEWS

सोलापूरच्या पत्रकारासह दोघांना गोळीबार करुन पोलिसांनी घेतले ताब्यात

पुणे : पुण्यातील खराडीमधील इ ऑन आयटी पार्क येथे सॉफ्टवेअरचा व्यवसाय करणार्‍या व्यक्तीकडे 5 कोटीची रुपयांची खंडणी मागणार्‍यांना पकडण्यासाठी गेलेल्या पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न खंडणीबहाद्दरांनी केला. परंतु प्रसंगावधान राखत पोलिसांनी त्यांच्या गाडीच्या पाठीमागील चालकावर गोळीबार करून तथाकथित पत्रकार व त्याच्या साथीदारास ताब्यात घेतले.

ही घटना गुरूवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सोलापूर-पुणे रोडवरील पाटस टोल नाक्याच्या जवळ घडली आहे. महेश सौदागर हणमे (रा. सोलापूर) असे हा पत्रकार व त्याचा साथीदार दिनेश हणमे (रा. सोलापूर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी हे ऑगस्ट 2022 पासून खराडी येथील इ ऑन आयटी पार्कमधील सॉफ्टवेअर व्यावसायिक संतोष पोपट थोर (रा. अलकॉन सोसायटी, खराडी, पुणे) यांच्याकडे खंडणी मागत होते. त्यांनी तब्बल 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. आतापर्यंत संतोष थोर यांनी खराडी येथील सोनिटिक्स कंपनीचे कार्यालयात रोख व ऑनलाईन 3 लाख 80 हजार रुपये दिलेले आहेत. दरम्यान, थोर यांच्याकडे हणमे याच्याकडून वेळोवेळी पैशाची मागणी होत होती. महेश हणमे हा स्वतः पत्रकार असल्याचे सांगत होता. त्याने फिर्यादीची बदनामी करण्याच्या उद्देशाने वेगवेगळया खोटया बातम्या तयार करून त्या बातम्या व्हॉट्सऍपवर व सोशल मिडियावर व्हायरल करून विविध लोकांना पाठवून पोलीस केस करण्याची धमकी दिली होती.

दरम्यान, आज महेश हणमे याने व्यावसायिक संतोष थोर यांना कुठल्याही परिस्थिती आज 5 कोटी रुपये हवे आहेत. ती दिल्यास संतोष थोर यांना व त्यांच्या कुटुंबीयास जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यासाठी त्याने त्यांना मोहोळ येथील हॉटेल स्वराज येथे बोलावले होते. दरम्यान व्यावसायिक संतोष थोर यांंनी याबाबतची माहिती गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना दिली.त्यानुसार पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर आयुक्त रामनाथ पाकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण आणि इतर पोलीस अंमलदार हे आरोपींच्या मागावर मोहोळकडे रवाना झाले. पोलीस आपल्या मागावर असल्याची चाहूल महेश हणमे यांस लागली. पाटस टोल नाक्याजवळ पोलीस गेले असता तेथे हणमे याने पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण यांनी प्रसंगावधान राखत हणमे याच्या गाडीच्या पाठीमागील चाकाच्या टायरवर पिस्तुलातून गोळया झाडल्या. आणि महेश हणमेे व दिनेश हणमे यांना गाडीतून बाहेर काढून ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संतोष थोर यांनी पुणे शहर चंदन नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

Previous Post

पर्यटन स्थळांप्रमाणे सोलापूरकरांना मिळतोय ‘या’ ठिकाणी आनंद…

Next Post

पंढरपूर बाजार समितीच्या सभापतीपदी हरिष गायकवाड तर उपसभापतीपदी राजूबापू गावडे बिनविरोध

Related Posts

पुण्यात पावसाने मोडला 117 वर्षांचा रेकॉर्ड !
मुख्य बातमी

पुण्यात पावसाने मोडला 117 वर्षांचा रेकॉर्ड !

July 30, 2026
भारताच्या लॉन टेनिस संघाच्या कर्णधार पदी संध्याराणी बंडगर यांची निवड
मुख्य बातमी

भारताच्या लॉन टेनिस संघाच्या कर्णधार पदी संध्याराणी बंडगर यांची निवड

July 30, 2026
मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन
मुख्य बातमी

मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन

July 28, 2026
वारकऱ्यांच्या नावाखाली आषाढीवारीत 50 लाखांचा चष्मे घोटाळा…!
मुख्य बातमी

वारकऱ्यांच्या नावाखाली आषाढीवारीत 50 लाखांचा चष्मे घोटाळा…!

July 28, 2026
भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रलतर्फे तीन गरजू लाभार्थ्यांना शिलाई मशीनचे वाटप
मुख्य बातमी

भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रलतर्फे तीन गरजू लाभार्थ्यांना शिलाई मशीनचे वाटप

July 28, 2026
आज संध्याकाळपर्यंत उजनी धरण 100% भरणार…!
मुख्य बातमी

आज संध्याकाळपर्यंत उजनी धरण 100% भरणार…!

July 27, 2026
Next Post
पंढरपूर बाजार समितीच्या सभापतीपदी हरिष गायकवाड तर उपसभापतीपदी राजूबापू गावडे बिनविरोध

पंढरपूर बाजार समितीच्या सभापतीपदी हरिष गायकवाड तर उपसभापतीपदी राजूबापू गावडे बिनविरोध

ताज्या बातम्या

ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

July 30, 2026
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान

July 30, 2026
पुण्यात पावसाने मोडला 117 वर्षांचा रेकॉर्ड !

पुण्यात पावसाने मोडला 117 वर्षांचा रेकॉर्ड !

July 30, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026