अहमदनगर रेल्वे वसाहतीत “मियावाकी” तंत्राने मोठ्या प्रमाणात रेल्वे विभागाकडून वृक्षारोपण

0
31

दिनांक 24.07.2023 – रोजी अहमदनगर रेल्वे काॅलनी मध्ये पर्यावरण प्रेमी माननीय नीरज कुमार दोहरे, मंडल रेल प्रबंधक, शैलेंद्र कुमार परिहार, अप्पर मंडल रेल प्रबंधक,व.मं.ईंजि.(समन्वयक) अधिकारी चंद्रभुषण तथा श्री फैज व श्री शिवाजी कदम, व.मं.संरक्षा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वैविध्य स्थानिक झाडांची रोपे, वेली यांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली.ज्यामध्ये 350 स्क्वेअर मीटर प्रांगणात एकूण 1000 रोपे लावण्यात आले.

ज्यामध्ये उंबर, चिंच, खैर, आवळा, करंज,बहावा,भोकर, हादगा, अंजीर, मोगरा, जाई, शिसम, बेल इत्यादी विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली.मियावाकी जापानी पद्धतीचे आधारित तंत्रज्ञान यामध्ये वापरण्यात आले असून यापुर्वीही सोलापूर विभागातील ह्याच तंत्राचा वापर करुन एकूण पाच मियावाकी सघन वन स्थापित करून हजारो स्थानिक झाडांची रोपे यशस्वी रित्या लावण्यात आलेली आहेत.येथे रोपांची लागवड करतेवेळी पावसाने आपली हजेरी लावून रेल्वे पर्यावरण प्रेमींना सुखद धक्का दिला त्या मुळे वृक्षलागवडीचा वेगळाच आनंद अनुभवता आला.

आज वृक्षारोपण काळाची गरज ओळखून रेल्वे विभागातर्फे वृक्ष लागवडीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे व स्थानिक झाडांची दुर्मिळता आज यक्ष प्रश्न बनलेला आहे. मियावाकी तंत्रज्ञानामुळे कमीत कमी जागेत वैविध्य स्थानिक झाडांची लागवड करण्यात येत आहे त्यामुळे अहमदनगर शहरात नवीन हरित पट्टा तैयार होईल.या लागवडीसाठी सामाजिक वनीकरण विभागाकडून विविध जातींचे एकूण 1200 रोपे मोफत मिळाली, ज्यामध्ये अहमदनगर जिल्हा वनक्षेत्रपाल श्री हेमंत उबाळे यांच्या कडून विशेष सहकार्य मिळाले.

आजच्या वृक्षारोपण कार्यक्रमांत अहमदनगर रेल्वे विभागाचे वाय.एम.व्हटकर, स.मं.ई.अधिकारी , एसएसई अजय चौबे, संजय उस्तुर्गे, संरक्षा सलाहाकार ,स्टेशन प्रबंधक तोमर, योगेश शेषगिरी व इंजिनिअरींग ,वैद्यकीय व स्वास्थ्य विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.रेल्वे वसाहतीतील महिला मंडळ व बाल गोपाळांनी आनंदानी व हिरारीने भाग घेऊन वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले व भविष्यात ह्याच तंत्रावर आधारित सघन वनांची संख्या रेल्वे तर्फे वाढवण्यात येणार असल्याचा मानस माननीय श्री शिवाजी कदम यांनी बोलून दाखवला.