मुंबई : पंकजा मुंडे यांनी दिल्लीवरून मुंबईत परतताच भेटीसाठी दाखल झालेल्या समर्थकाशी संवाद साधला. “माझा आतापर्यंतचा प्रवास खडतर होता, पुढेही खडतरच दिसतो आहे ; पण अविचाराने निर्णय घ्यायचे नसतात, असे सांगत पंकजा यांनी कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांनी दिलेले राजीनामे नाकारत असल्याचे ही स्पष्ट केले .
पंकजा म्हणाल्या, “गोपीनाथ मुंडे यांनी मला आमदारकीसाठी राजकारणात आणले नाही. तर ज्या लोकांना त्यांना उभे केले त्यांच्यासाठी मला त्यांनी राजकारणात आणले . त्यांनी मोठ्या उद्देशाने आणलेले नाही. मला मंत्री करा, माझ्या बहिणीला मंत्री करा यासाठी मी राजकारणात आले नाही. गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारे लोक माझे कुटुंब आहेत”, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. पायाखालची जमीन सरकलेली असताना मंत्रीपद नाकारणारी पंकजा मुंडे तुम्हाला राजीनामा द्यायला लावेल का? मला दबावतंत्र वापरायचे नाही, असे सांगत पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांनी दिलेले राजीनामे नाकारत असल्याची घोषणा केली.







