• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आजपासून 2410 रुपये प्रति क्विंटल दराने नाफेड व एनसीसीएफकडून कांदा खरेदी सुरू : कृषी मंत्री धनंजय मुंडे

Yes News Marathi by Yes News Marathi
August 22, 2023
in मुख्य बातमी
0
आजपासून 2410 रुपये प्रति क्विंटल दराने नाफेड व एनसीसीएफकडून कांदा खरेदी सुरू : कृषी मंत्री धनंजय मुंडे
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : केंद्र सरकार भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ मर्यादित (नाफेड) आणि भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ मर्यादित (एनसीसीएफ) मार्फत राज्यातील 2 लाख मेट्रिक टन कांदा 2410 रुपये प्रति क्विंटल या दराने आजपासूनच खरेदी सुरू झाली, असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर माध्यमांना दिली.

केंद्रीय वाणिज्य मंत्री श्री गोयल यांच्या शासकीय निवासस्थानी कृषी मंत्री श्री मुंडे यांनी भेट घेतली. यावेळी आमदार अतुल बेनके हे ही उपस्थित होते. बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधतांना श्री मुंडे म्हणाले, राज्यातील अहमदनगर, नाशिक, लासलगाव आदी केंद्रांवरून हा कांदा खरेदी करण्यात येणार असून आवश्यकता भासल्यास दोन लाख मेट्रिक टन पेक्षा अधिक कांदा देखील खरेदी केला जाईल. या खरेदीची सुरुवात आज 12:00 वाजल्यापासूनच सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

कांदा निर्यातीवर 40% निर्यात शुल्क लावल्यानंतर कांद्याचे बाजारभाव कमी होतील आणि शेतकऱ्यांचे नुकसान होईल, ते होऊ नये यासाठी कृषीमंत्री श्री मुंडे यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री श्री गोयल यांची भेट घेतली. याबैठकीत झालेल्या चर्चेनुसार नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत राज्यातील 2 लाख मेट्रिक टन कांदा 2410 रुपये प्रति क्विंटल दराने आज 12 वाजल्यापासून खरेदी केला जाईल असे ठरले असल्याचे श्री मुंडे यांनी सांगितले. विषयाची संवेदनश‍ीलता बघता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनीही केंद्रीय मंत्री श्री गोयल यांच्याशी दुरध्वनीवरून संवाद साधला असल्याची माहिती त्यांनी यांवेळी दिली.

प्रति क्विंटल 2410 रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केले जातील. शेतकऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन मागे घ्यावे, केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही श्री मुंडे यांनी यावेळी दिली. जाहीर केलेला दर समाधानकारक असून शेतकऱ्यांनी नाफेड आणि एनसीसीएफला कांदा विक्री करावी, अशी विंनतीही शेतकऱ्यांना श्री मुंडे यांनी यावेळी माध्यमांच्या माध्यमातून केली.

केंद्र सरकारने निर्यात शुल्काबाबत पुनर्विचार करावा अशी मागणी राज्य शासनाकडून करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगतिले. मात्र दरम्यानच्या काळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, या दृष्टीने तात्काळ खरेदीचा घेतलेला निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा असल्याचे सांगुन त्यांनी केंद्र सरकारचे धन्यवाद मानले.

Previous Post

सोमपा परिवहन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत नगरविकास विभागास तात्काळ अहवाल देण्याचे मा. मुख्यमंत्री यांचे आदेश!

Next Post

स्व. राजेश आण्णा कोठे गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी हरिभाऊ सावंत तर कार्याध्यक्षपदी कुणाल मोरे

Related Posts

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

October 12, 2026
ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू
मुख्य बातमी

ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू

October 12, 2026
एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!
मुख्य बातमी

एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!

October 12, 2026
Next Post
स्व. राजेश आण्णा कोठे गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी हरिभाऊ सावंत तर कार्याध्यक्षपदी कुणाल मोरे

स्व. राजेश आण्णा कोठे गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी हरिभाऊ सावंत तर कार्याध्यक्षपदी कुणाल मोरे

ताज्या बातम्या

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026
कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

October 13, 2026
दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !

दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026